दिल्ली कॅपिटल्सला माेठा धक्का, पंत एका सामन्यासाठी निलंबित

दिल्ली कॅपिटल्सला माेठा धक्का, पंत एका सामन्यासाठी निलंबित

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला आयपीएलच्या प्रशासकीय समितीने एका सामन्यासाठी निलंबित केले आहे. तसेच त्‍याला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
कारवाई कोणत्‍या कारणासाठी?

यंदाच्‍या IPL स्‍पर्धेत स्लो ओव्हर रेटमुळे पंतवर तिसऱ्यांदा कारवाई झाली आहे.
आता राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या स्लो ओव्हर रेटमुळे त्याला एका सामन्‍यासाठी निलंबित केले आहे.
त्‍यामुळे तो पुढील सामन्‍याला मुकणार आहे.

राजस्थानविरुद्धच्‍या सामन्‍यात जुन्याच चुकीची पुनरावृत्ती
यापूर्वी, 31 मार्च रोजी चेन्नई आणि 3 एप्रिल रोजी कोलकाताविरुद्धच्या सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला होता. मात्र, त्याने आपल्या आधीच्या चुकीपासून धडा घेतला नाही. राजस्थानविरुद्ध 7 मे रोजी जुन्याच चुकीची पुनरावृत्ती केली, ज्यावरून आता बीसीसीआयने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. आता एका सामन्‍यासाठी त्‍याला निलंबित करण्‍यात आले आहे.
आयपीएलने जारी केले निवेदन
ऋषभ पंतवर करण्‍यात आलेल्‍या कारवाईबाबत आयपीएलने एक निवदेन जारी केले आहे. यामध्‍ये म्‍हटलं आहे की,”दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याचा संघ इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थानविरुद्ध खेळला होता. ऋषभ पंतला 30 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. लाख कारण प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या सामन्या 56 मधील किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित आयपीएल आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील तिसरा गुन्हा होता. प्रभावशाली खेळाडूसह प्लेइंग इलेव्हनचे उर्वरित सदस्य होते वैयक्तिकरित्या 12 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के, जे कमी असेल ते दंड आकारला जाईल.
दिल्लीचे अपील फेटाळले
“आयपीएल आचारसंहितेच्या कलम आठ नुसार, दिल्ली कॅपिटल्सने सामनाधिकारींच्या निर्णयाला आव्हान देणारे अपील दाखल केले. त्यानंतर ते अपील बीसीसीआयकडे पुनरावलोकनासाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. “आणि याची पुष्टी झाली आहे. सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो.” त्‍यामुळे ऋषभ पंतवरील कारवाईविरोधात दिल्लीचे अपील फेटाळल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा : 

IPL 2024 : षटकारांचा पाऊस! IPL 2024 मध्ये 1000 षटकार पूर्ण
IPL 2024 : आयपीएल प्लेऑफमध्ये कोण बाजी मारणार?
IPL 2024: पंचांशी वाद घालणे संजू सॅमसनला पडले महागात, BCCIने केली ‘ही’ कारवाई

Latest Marathi News दिल्ली कॅपिटल्सला माेठा धक्का, पंत एका सामन्यासाठी निलंबित Brought to You By : Bharat Live News Media.