हार्दिक पंड्या म्हणाला, ‘‘स्वगृही आल्याचा आनंद’’!
मुंबई, वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली अन् आतापासूनच आयपीएल 2024 चा ट्रेंड सुरू झाला. स्वगृही पुनरागमन झाल्यानंतर हार्दिकने आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत पंड्याने आठवणींना उजाळा दिला. आयपीएल 2015 च्या हंगामातून पंड्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात केली. मुंबईकडून खेळताना प्रसिद्धी मिळवलेल्या पंड्याने याच जोरावर पुढे भारतीय संघात जागा मिळवली.
दरम्यान, आपल्या आयपीएल प्रवासाचा दाखला देणारा व्हिडीओ हार्दिकने पोस्ट केला आहे, ज्यामध्ये 10 लाख रुपयांपासून हार्दिकवर लागलेली बोली त्याने दर्शवली आहे. तसेच मुंबईच्या खेळाडूंसोबत घालवलेले क्षण, ड्रेसिंग रूममधील आठवणींचा दाखला हार्दिक पंड्या याने दिला.
हार्दिक पंड्याच्या परत येण्यामुळे आम्ही खूप उत्साही झालो आहोत. मुंबई इंडियन्सच्या कुटुंबाचे रियुनियन हे हृदयस्पर्शी आहे. मुंबई इंडियन्सचा युवा प्रतिभाशाली खेळाडू ते भारतीय संघाचा स्टार! हार्दिकने मोठी झेप घेतली आहे. हार्दिक पंड्या भविष्यात मुंबई इंडियन्ससाठी अजून कोणती भन्नाट कामगिरी करतोय हे पाहण्यास आम्ही उत्सुक आहोत.
– नीता अंबानी, मालक, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी
हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्समध्ये परतल्याचे पाहून खूप आनंद झाला आहे. त्याची घरवापसी झाली आहे. तो संघाचा समतोल सांभाळणारा उत्कृष्ट खेळाडू आहे. हार्दिकची मुंबई इंडियन्ससोबतची पहिली इनिंग खूप यशस्वी होती. आता त्याची दुसरी इनिंगदेखील त्यापेक्षा जास्त यशस्वी असेल अशी आशा करूया.
-आकाश अंबानी, डायरेक्टर, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी
हेही वाचा…
Champions Trophy Controversy : पाकिस्तान गमावणार चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद, कारण…
Ravi Shastri : टीम इंडिया 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकेल : रवि शास्त्रींची भविष्यवाणी
Shubman Gill GT Captain | कॅप्टन गिल! शुभमन गिल याच्याकडे गुजरात टायटन्सचे नेतृत्त्व, पंड्या MI मध्ये परतल्याने संघात मोठा बदल
The post हार्दिक पंड्या म्हणाला, ‘‘स्वगृही आल्याचा आनंद’’! appeared first on पुढारी.
मुंबई, वृत्तसंस्था : जगातील सर्वात मोठी ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएल आपल्या आगामी हंगामाकडे कूच करत आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याची मुंबई इंडियन्सच्या संघात घरवापसी झाली अन् आतापासूनच आयपीएल 2024 चा ट्रेंड सुरू झाला. स्वगृही पुनरागमन झाल्यानंतर हार्दिकने आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर एक पोस्ट करत पंड्याने आठवणींना उजाळा दिला. आयपीएल 2015 च्या हंगामातून …
The post हार्दिक पंड्या म्हणाला, ‘‘स्वगृही आल्याचा आनंद’’! appeared first on पुढारी.