अरविंद केजरीवालांनी दिल्लीत घेतले हनुमानाचे दर्शन

अरविंद केजरीवालांनी दिल्लीत घेतले हनुमानाचे दर्शन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची काल (दि.११) सायंकाळी ७ वाजता अंतरिम जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर आजपासून ते लोकसभा निवडणुक प्रचारात सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी सहपत्नी सुनीता केजरीवाल यांच्यासह कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, “हनुमानजींच्या आशीर्वादाने, करोडो लोकांच्या प्रार्थना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या न्यायाने तुम्हा सर्वांमध्ये परतताना मला खूप आनंद होत आहे”.
Arvind Kejriwal : ‘आज भेटू , तुम्ही सर्वांनी यावे’- दिल्लीवासियांना केजरीवालांचे आव्हान

सकाळी 11 – हनुमान मंदिर, कॅनॉट प्लेस
दुपारी 1 – पत्रकार परिषद, पक्ष कार्यालय
दुपारी 4 – रोड शो – दक्षिण दिल्ली – मेहरौली
संध्याकाळी ६ – रोड शो – पूर्व दिल्ली – कृष्णा नगर

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal offers prayers at Hanuman Mandir in Connaught Place.
His wife Sunita Kejriwal and Punjab CM Bhagwant Mann are also with him. pic.twitter.com/Xci2LNwx3d
— ANI (@ANI) May 11, 2024

#WATCH | Delhi CM Arvind Kejriwal offers prayers at Sri Navgrah Mandir in Connaught Place.
His wife Sunita Kejriwal and Punjab CM Bhagwant Mann are also with him. pic.twitter.com/nsJRILComJ
— ANI (@ANI) May 11, 2024

हेही वाचा:

Arvind Kejriwal : ‘हुकूमशाही संपेल, जनताच न्याय करेल’, तुरुंगातून बाहेर येताच केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
Arvind Kejriwal : केजरीवाल करणार लोकसभा निवडणूक प्रचार, त्यांच्या वकिलांनी दिली माहिती

 

Go to Source