डेंग्यूची लस २ वर्षांत बाजारात; पुढील वर्षी मानवी चाचण्या : ICMR

लखनौ, वृत्तसंस्था : जीवघेण्या डेंग्यूवरील लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून, या लसीच्या मानवी चाचण्या येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, या चाचण्यांच्या निष्कर्षांनंतर जानेवारी 2026 पर्यंत ही लस देशभर उपलब्ध होईल. त्यामुळे आगामी काळात डेंग्यूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल. (Dengue vaccine) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ‘आयसीएमआर’मधील संशोधक शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता … The post डेंग्यूची लस २ वर्षांत बाजारात; पुढील वर्षी मानवी चाचण्या : ICMR appeared first on पुढारी.
#image_title

डेंग्यूची लस २ वर्षांत बाजारात; पुढील वर्षी मानवी चाचण्या : ICMR

लखनौ, वृत्तसंस्था : जीवघेण्या डेंग्यूवरील लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून, या लसीच्या मानवी चाचण्या येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, या चाचण्यांच्या निष्कर्षांनंतर जानेवारी 2026 पर्यंत ही लस देशभर उपलब्ध होईल. त्यामुळे आगामी काळात डेंग्यूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल. (Dengue vaccine)
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ‘आयसीएमआर’मधील संशोधक शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता यांनी लखनौत सूक्ष्मजीव शास्त्रज्ञांच्या परिषदेत डेंग्यूच्या लसीवर सुरू असलेल्या संशोधनाबाबत तपशीलवार माहिती दिली. त्यानुसार या लसीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
सिरम इन्स्टिट्यूट आणि पॅनाशे बायोटेक या दोन कंपन्यांना मानवी चाचण्यांचा तिसरा टप्पा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून, या कंपन्या एप्रिल 2024 पासून नागरिकांवर या लसीच्या चाचण्या घेण्यास प्रारंभ करतील. या चाचण्या नोंदणी केलेल्या 10 हजार स्वयंसेवकांवर केल्या जाणार आहेत. या चाचण्यांच्या निष्कर्षांचा अभ्यास केल्यावर या लसीची नोंदणी होईल व ती बाजारात उपलब्ध करून दिली जाईल.
कोरोना लसीचा दुष्परिणाम नाही
याच परिषदेत कोरोनाच्या लसीबाबत ‘आयसीएमआर’च्या मदतीने करण्यात आलेल्या अभ्यासाचा सारांश सादर करण्यात आला. त्यानुसार कोरोनाच्या लसीमुळे तरुणांच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याच्या चर्चेत कसलाही अर्थ नसल्याचे समोर आले आहे. 18 ते 45 वयोगटातील जे रुग्ण अचानक मरण पावले त्यांच्या वैद्यकीय अहवालांचा अभ्यास करून असे समोर आले आहे की, जीवनशैलीशी संबंधित घटकांशी हे सारे मृत्यू आहेत. त्यात धूम्रपान, मद्यपान, उत्तेजक द्रव्यांचा वापर आणि कठोर शारीरिक व्यायाम आदी बाबींचा समावेश आहे. (Dengue vaccine)
घातक डेंग्यू रोग मानवाच्या मुळावर
भारतात दररोज 600 जणांना डेंग्यूची लागण
2022 मध्ये देशात 2 लाख 33 हजार 251 रुग्ण
2023 मध्ये 17 सप्टेंबरपर्यंत 94 हजार 198 जणांना लागण
2022 मध्ये 303 मृत्यू
2023 : आतापर्यंत 91 मृत्यू
The post डेंग्यूची लस २ वर्षांत बाजारात; पुढील वर्षी मानवी चाचण्या : ICMR appeared first on पुढारी.

लखनौ, वृत्तसंस्था : जीवघेण्या डेंग्यूवरील लस लवकरच बाजारात उपलब्ध होणार असून, या लसीच्या मानवी चाचण्या येत्या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार असून, या चाचण्यांच्या निष्कर्षांनंतर जानेवारी 2026 पर्यंत ही लस देशभर उपलब्ध होईल. त्यामुळे आगामी काळात डेंग्यूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल. (Dengue vaccine) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ‘आयसीएमआर’मधील संशोधक शास्त्रज्ञ डॉ. निवेदिता गुप्ता …

The post डेंग्यूची लस २ वर्षांत बाजारात; पुढील वर्षी मानवी चाचण्या : ICMR appeared first on पुढारी.

Go to Source