सांगली : जिल्ह्यात कृषी केंद्रांवर भरारी पथकाचे छापे
सांगली; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री अॅग्रो कंपनीच्या कवठेपिरान व पायाप्पाचीवाडी येथील कृषी केंद्रांवर राज्य सरकारचा कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त भरारी पथकाने आज छापे टाकले. या दुकानातून मुदत संपलेली कीटकनाशके विक्री सुरू असल्याच्या संशयाने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. तपासणीनंतर अधिक माहिती देता येईल, असे अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी मिरज तालुक्यातील एका प्रक्रिया संस्था चालकाने अनुदान स्वरूपात शासनाची व कर्ज स्वरूपात वित्तीय संस्थेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप झाल्यानंतर उपनिबंधकांनी कवठेपिरान (ता. मिरज) येथील 31 शेतकर्यांची इन कॅमेरा सुनावणी घेतली. मिरज तालुका द्राक्ष, हळद, भाजीपाला उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था या नावाची संस्था मिरज येथील उपनिबंधक कार्यालयामध्ये सुमारे तीन वर्षांपूर्वी नोंद झाली आहे. या संस्थेने शासनाकडून अनुदान स्वरूपात व वित्तीय संस्थेकडून कर्ज स्वरूपात लाखो रुपये घेतले आहेत.
लेखापरीक्षण अहवालानुसार सचिवाला 26 हजार 250 रुपये पगार आहे. या संस्थेचे कागदोपत्री 70 सभासद असले तरी प्रत्यक्षात 600 हून अधिक सभासद आहेत. ही संस्था कागदोपत्रीच असून संस्थाचालकांनी लाखो रुपयांचे अनुदान व कर्ज हडप केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, या कंपनीशी संबंधीत खते, कीटकनाशके, औषधे विक्रीची कवठेपिरान व पायाप्पाचीवाडी येथे कृषी केंद्रे आहेत. या केंद्रांसंदर्भात तक्रार आल्यानंतर कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापे टाकले. रात्री उशिरापर्यंत ही तपासणी होती. तपासणी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती सांगण्यात येईल, असे अधिकार्यांनी सांगितले.
सुट्टीचा दिवस असूनही कारवाई
सह्याद्री अॅग्रो कंपनीविरोधातील तक्रारीची गंभीर दखल घेतली गेली आहे. सोमवारी सुट्टी असतानाही भरारी पथकाने छापे टाकले. तपासणीसाठी दप्तर ताब्यात घेण्यात आले आहे.
शेतकर्यांची इन कॅमेरा चौकशी
याप्रकरणी संस्थेच्या अनेक संचालक व सभासदांनी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन केले होते. जिल्हाधिकारी यांनी याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले होते. घटनेची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मिरजेचे उपनिबंधक सुनील चव्हाण यांना तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार शेतकर्यांची इन कॅमेरा चौकशी सुरू आहे.
The post सांगली : जिल्ह्यात कृषी केंद्रांवर भरारी पथकाचे छापे appeared first on पुढारी.
सांगली; पुढारी वृत्तसेवा : सह्याद्री अॅग्रो कंपनीच्या कवठेपिरान व पायाप्पाचीवाडी येथील कृषी केंद्रांवर राज्य सरकारचा कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्या संयुक्त भरारी पथकाने आज छापे टाकले. या दुकानातून मुदत संपलेली कीटकनाशके विक्री सुरू असल्याच्या संशयाने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. तपासणीनंतर अधिक माहिती देता येईल, असे …
The post सांगली : जिल्ह्यात कृषी केंद्रांवर भरारी पथकाचे छापे appeared first on पुढारी.