नांदेड : गोदावरी नदीपात्रात क्रुझर कोसळून दोघांना जलसमाधी

मुदखेड; पुढारी वृत्तसेवा : लोहा तालुक्यातील येळी महाटी पुलावरुन क्रुझर जीप गोदावरी नदीत कोसळल्याने दोघांना जलसमाधी मिळाली. घटनास्थळी उस्माननगर व मुदखेड पोलिसांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली असून उद्धव आनंदराव खानसोळे आणि थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड तालुक्यातील शिखांची वाडी येथील उद्धव खानसोळे हे आपली …

नांदेड : गोदावरी नदीपात्रात क्रुझर कोसळून दोघांना जलसमाधी

मुदखेड; Bharat Live News Media वृत्तसेवा : लोहा तालुक्यातील येळी महाटी पुलावरुन क्रुझर जीप गोदावरी नदीत कोसळल्याने दोघांना जलसमाधी मिळाली. घटनास्थळी उस्माननगर व मुदखेड पोलिसांनी भेट देऊन अपघाताची पाहणी केली असून उद्धव आनंदराव खानसोळे आणि थोराजी उर्फ बबलू मारोती ढगे अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुदखेड तालुक्यातील शिखांची वाडी येथील उद्धव खानसोळे हे आपली क्रुझर जीप घेऊन येळी येथील त्यांचा मित्र थोराजी उर्फ बबलू ढगे यांना भेटण्यासाठी आले होते. दुपारी चारनंतर करून दोघेही क्रुझरने (एम एच २६ बी क्यू २०६१) येळी येथून मुदखेडच्या दिशेने निघाले. यावेळी क्रुझर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने येळी गावाच्या जवळ असणाऱ्या गोदावरी नदी पात्रात ३० ते ३५ फुट खोल पाण्यात त्यांची जीप कोसळली. गाडीसह दोघेही बुडाले. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनंतर उस्माननगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत पवार, बीट जमादार निळकंठ श्रीमंगले, पवार यांच्यासह अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली. व बोटीच्या सहाय्याने दोन्ही मृतदेहासह क्रुसर जीपही गोदावरी पात्रातून बाहेर काढली. त्यांनतर मुदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.