दिंडोरीत अनैतिक संबंधातून युवकाचा खून? घरापासून 100 मीटरवर विहिरीत आढळला मृतदेह
दिंडोरी : Bharat Live News Media वृत्तसेवा– तालुक्यातील तिल्लोळी येथे एका ३५ वर्षीय युवकाचा खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकून दिल्याचा प्रकार गुरुवारी (दि.९) उघडकीस आला.
तिल्लोळी येथील अनिल पोपट गायकवाड (३५) याचा घरापासून १०० मीटर अंतरावरील एका विहिरीत मृतदेह आढळला. दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. पंचनामा केला असता मृताच्या डोक्यावर व हाताच्या पंजावर गंभीर जखमा दिसून आल्यात. हत्याराने वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यादिशेने तपासाची चक्रे फिरवली जात असताना, मयताचा भाऊ नाना गायकवाड (रा. दुगाव) याने फिर्याद नोंदवली. त्यात, अनिल याचे रवळगाव येथील एका महिलेशी अनैतिक प्रेम संबंध होते. त्यातूनच तिच्या भावाने खून केला असावा, अशा संशय वर्तविला आहे. त्यानुसार संशयित सागर टोंगारे यासह एका अज्ञाताविराेधात खूनाचा गुन्हा नोंदविला आहे. संशययितास ताब्यात घेतले असून, पोलिस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुदर्शन आवारे हे अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा –
सिंधुदुर्ग: तळवडे येथे पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू: एकाला वाचविण्यात यश
T20 World Cup : टीम इंडियाचे टी-20 वर्ल्डकपसाठी दोन बॅचमध्ये उड्डाण, हिटमॅन-बुमराह-पंड्या पहिला जाणार
नागपूर: कळमना बाजारात मिरचीची २० हजार पोती पाण्यात; वीज पडून ८ जनावरे दगावली