चेन्नईने नाणेफेक जिंकली; प्रथम गोलंदाजीचा निर्णय
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024च्या 59 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होत आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. सामन्यात चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने सामन्यात बदल केला आहे. रिचर्ड ग्लीसनच्या जागी रचिन रवींद्रने संघात पुनरागमन केले आहे. तर गुजरातनेही आपल्या संघात दोन बदल केले आहेत. मॅथ्यू वेडच्या जागी कार्तिक त्यागीचा आणि रिद्धिमान साहाच्या जागी जोशुआ लिटलला प्लेईंग-11 मध्ये संधी देण्यात आली आहे.
गुजरातसाठी करा किंवा मरा
गुजरातसाठी हा नॉकआऊट सामना आहे. सामन्यात गुजरातला पराभव झाल्यास त्यांचा स्पर्धेतील प्ले ऑफमधील प्रवास खडतर होणार आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग -11
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शाहरुख खान, डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड (यष्टीरक्षक), राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा, कार्तिक
इम्पॅक्ट प्लेयर : अभिनव मनोहर, संदीप वॉरियर , बी.आर.शरथ, दर्शन नळकांडे, जयंत यादव.
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे, सिमरजीत सिंग.
इम्पॅक्ट प्लेयर : अजिंक्य रहाणे, शेख रशीद, अरावेली अवनीश, समीर रिझवी, मुकेश चौधरी.