शांतिगीरी महाराजांनी घेतली भुजबळ यांची भेट, चर्चांणा उधाण
नाशिक : Bharat Live News Media ऑनलाइन- नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांनी भुजबळ फार्म येथे राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार, सुभाष भामरे आणि हेमंत गोडसे यांनी यापूर्वी भुजबळांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. १०) शांतिगिरी महाराजांनी भेट घेतल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
शांतिगिरी महाराज महायुतीकडून उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, हेमंत गोडसे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्याने शांतिगिरी महाराजांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. छगन भुजबळ हे महायुतीमध्ये आहेत, मात्र अपक्ष उमेदवार असलेल्या उमेदवाराने त्यांची भेट घेतल्याने नाशिकच्या वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे.
दरम्यान. छगन भुजबळ हे हेमंत गोडसे यांच्या प्रचारात पाहीजे तितके अद्याप सक्रीय नसल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी तर भुजबळ हे दिंडोरीत तुतारीचा प्रचार करत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यामुळे छगन भुजबळ आणि शांतिगीरी महाराज यांच्यात त्या अनुषंगाने काही चर्चा तर झाली नसावी असेही बोलले जात आहे.