बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी ३६० डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi tunnel rescue) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, मंगळवारी सकाळपर्यंत ५० मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम पूर्ण झाले आहे. बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचही काम सुरू असून त्याचा पहिला व्हिडिओ देखील समोर आला … The post बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण appeared first on पुढारी.
#image_title

बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी ३६० डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi tunnel rescue) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, मंगळवारी सकाळपर्यंत ५० मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम पूर्ण झाले आहे. बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचही काम सुरू असून त्याचा पहिला व्हिडिओ देखील समोर आला आहे.

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Visuals from the Silkyara tunnel where the operation to rescue 41 workers is ongoing.
First visuals of manual drilling ongoing inside the rescue tunnel. Auger machine is being used for pushing the pipe. So far about 2 meters of… pic.twitter.com/kXNbItQSQR
— ANI (@ANI) November 28, 2023

Uttarakhand tunnel rescue: Manual drilling underway, 50 metres crossed so far in total
Read @ANI | https://t.co/lxj1V81GC3#UttarakhandTunnelRescue #Uttarakhand #Uttarkashi pic.twitter.com/jrjNyUjce0
— ANI Digital (@ani_digital) November 28, 2023

बोगद्यावरील टेकडीवरून व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी (उभा छेद) लष्करातील जवानांना पाचारण करण्यात आले आहे. मद्रासमधील लष्करातील इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बोगद्याच्या वरून उभ्या ड्रिलिंगने मंगळवार सकाळपर्यंत आवश्यक असलेल्या ८६ मीटरपैकी ५० मीटर खोली गाठली आहे. गुरुवारपर्यंत खाली बोगद्याच्या वरच्या भागातून बाहेर पडल्यावर या एक मीटर रुंद शाफ्टमधून कामगारांना बाहेर काढण्याची आशा बचावकर्त्यांना आहे. सूक्ष्मबोगदा तज्ज्ञ ख्रिस कूपर यांनी सांगितले की, “काल रात्री व्यवस्थत खनन झालं. आम्ही ५० मीटर अंतर पार केले आहे. आता ५-६ मीटरचं अंतर पार करायचं आहे. काल रात्री आम्हाला कोणतेही अडथळे आले नाहीत.”
दरम्यान, बोगद्याच्या आत मॅन्युअल ड्रिलिंगचही काम सुरू आहे. पाईप पुश करण्यासाठी ऑगर मशीनचा वापर केला जात आहे.

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Micro tunnelling expert Chris Cooper says, “…It went very well last night. We have crossed 50 metres. It’s now about 5-6 metres to go…We didn’t have any obstacles last night. It is looking very positive…” pic.twitter.com/HQssam4YUs
— ANI (@ANI) November 28, 2023

#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Visuals from the Silkyara tunnel where the operation to rescue 41 workers is ongoing.
Manual drilling is going on inside the rescue tunnel and auger machine is being used for pushing the pipe. As per the last update, about 2… pic.twitter.com/26hw32fChI
— ANI (@ANI) November 28, 2023

मजुरांचे मनोबल वाढविणार
आपत्ती निवारण विभागाचे सदस्य (एनडीआरएफ) माजी लेफ्टनंट जनरल सैयद अता हैसनन यांनी बचावकार्य सुरळीत सुरू असून, चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले. बोगद्यातील मजुरांना अन्न आणि औषधपुरवठा केला जात आहे. शिवाय, त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नातेवाईकांसह बचावकार्यातील अधिकारी मजुरांना धीर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्र यांनी सोमवारी बचावकार्याचा आढावा घेतला.  (Uttarkashi Tunnel)
हे असतील पर्याय

बोगद्याला समांतर छेद देण्याच्या पर्यायावरही विचार सुरू आहे. विशिष्ट अंतरापर्यंत हाताने समांतर (हॉरिझाँटल) खोदकाम करण्यात येणार आहे.
बोगद्याच्या विरुद्ध दिशेकडून खोदकामाचाही पर्याय आहे. बोगद्याच्या विरुद्ध दिशेला बारकोट हे ठिकाण आहे. या ठिकाणापासून मजूर ४८० मीटर अंतरापर्यंत आतवर आहेत.
मुख्य बोगद्याच्या डाव्या बाजूला छोटा बोगदा खणण्याचा विचारही सुरू आहे. यासाठी १८० मीटर लांब खोदकाम करावे लागणार आहे.
व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी ६० ते ८६ मीटरपर्यंत खोदकाम करावे लागणार आहे. रविवारपासून आज सकाळपर्यंत ५० मीटरपर्यंत आतवर खोदकाम झाले आहे.

मजुरांशी असा  होतो संवाद…
ऑडिओ कम्युनिकेशन सेटअप आणि बीएसएनएलच्या टेलिफोनिक कम्युनिकेशन्स सिस्टीमद्वारे बोगद्यातील मजुरांशी संपर्क साधून संवाद साधला जात आहे.
The post बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिल्क्यारा बोगद्यात गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी ३६० डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi tunnel rescue) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, मंगळवारी सकाळपर्यंत ५० मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम पूर्ण झाले आहे. बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचही काम सुरू असून त्याचा पहिला व्हिडिओ देखील समोर आला …

The post बोगद्यातील मॅन्युअल ड्रिलिंगचा पहिला व्हिडिओ समोर; ५० मीटर उभे खोदकाम पूर्ण appeared first on पुढारी.

Go to Source