सनी देओल -आयुष्मानच्या ‘बॉर्डर-२’ ची रिलीज डेट ठरली?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांच्या ‘बॉर्डर-२’ ( Border-2 ) या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १९९७ मधील प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणकी वाढली आहे. अभिनेता सनी देओल …
सनी देओल -आयुष्मानच्या ‘बॉर्डर-२’ ची रिलीज डेट ठरली?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांच्या ‘बॉर्डर-२’ ( Border-2 ) या चित्रपटाची घोषणा करण्यात आल्यापासून चाहते त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट १९९७ मधील प्रदर्शित झालेल्या ‘बॉर्डर’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणकी वाढली आहे.
अभिनेता सनी देओल आणि आयुष्मान खुराना हे ‘बॉर्डर-२’ हा चित्रपटासाठी गेल्या एक वर्षापासून मेहनत घेत आहेत. आता हा चित्रपट अंतिम टप्प्यात असून टीमने चित्रपटाची संपूर्ण स्क्रिप्ट तयार केली आहे. याच दरम्यान चाहत्यांना आनंद द्विगुणीत करत निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट समोर आणली आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘बॉर्डर-२’ हा चित्रपट दोन वर्षांनी म्हणजे, २३ जानेवारी २०२६ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी रिलीज होणार आहे.
या चित्रपटत भारतातील सर्वात मोठे युद्ध दाखविले जाणार आहे. सनी देओल आणि आयुष्मान हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्रित या चित्रपटात काम करणार आहेत. भूषण कुमार, जेपी दत्ता आणि निधी दत्ता हे ‘बॉर्डर-२’ ची निर्मिती करत आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी अनुराग सिंग सांभाळणार आहे. २०२६ हे वर्ष ‘बॉर्डर-२’ साठी खास आहे कारण, या वर्षी आधीच्या ‘बॉर्डर’ चित्रपटाला २९ वर्षे पूर्ण होणार आहेत.
‘बॉर्डर’ हा चित्रपट १९९७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे लेखन आणि निर्मिती जेपी दत्ता यांनी केले होते. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित होता.
हेही वाचा 

Mirzapur Season 3 : ‘मिर्झापूर 3’ मध्ये नव्या पात्राची एन्ट्री; कथेत नवं ट्विस्ट
Virat Kohli : विराट कोहलीने प्रिती झिंटाची मागितली माफी, कारण…
Justin Bieber : पॉप स्टार जस्टिन बीबरने दिली गुड न्यूज, लग्नाच्या ६ वर्षांनंतर घरी हलणार पाळणा