राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेलांनी घेतली राज्यसभा सदस्यत्वाची शपथ
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यसभेवर अलीकडेच निवडून आलेले प्रफुल पटेल (Praful Patel) यांना उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी शनिवारी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांच्या दालनात प्रफुल पटेल यांचा शपथविधी पार पडला. प्रफुल पटेल अजित पवार गटाकडून राज्यसभेवर निवडून आलेले पहिले सदस्य आहेत.
महाराष्ट्रातून ६ खासदार राज्यसभेवर निवडुन गेले, त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल पटेल वगळता भाजकडुन निवडुन गेलेले अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे, डॉ. मेधा कुलकर्णी, काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे, शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांनी यापूर्वीच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.
“उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या उपस्थितीत आज राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. आपला महान देश आणि देशवासियांच्या उन्नतीसाठी सदैव समर्पित राहण्यास मी कटिबद्ध आहे,” अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी शपथ घेतल्यानंतर दिली.
An immense honor to take the oath as a Rajya Sabha MP today, in the esteemed presence of the honorable Vice President, Shri Jagdeep Dhankhar Ji.
Here’s a glimpse of the oath-taking ceremony, a moment filled with solemnity and commitment to serve the nation. Looking forward to… pic.twitter.com/B4qrZNv2qp
— Praful Patel (@praful_patel) May 10, 2024