आपला जोडीदार निवडताना अडकाल फसवणुकीच्या रेशीमगाठीत

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एखादी वस्तू आपण अत्यंत पारखून खरेदी करतो, मात्र विवाह जुळविणार्या संकेतस्थळावरन आयुष्याचा जोडीदार निवडताना सखोल चौकशी केली जात नाही. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर आणि त्याच्या प्रोफाईलमधील माहितीवर विश्वास ठेवत मुली, महिला तत्काळ लग्नास होकार दर्शवतात. नंतर त्यांची आर्थिक फसवणूक होते. शिवाय नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे विवाह संकेतस्थळावरुन जोडीदार निवडताना काळजी घेणे गरजेचे आहे.
अशाच प्रकारे एका महिलेला विवाह संकेतस्थळावरून परदेशातील एका व्यक्तीचे स्थळ आले, परंतु आपला भावी जोडीदार फसवणूक करेल, हे महिलेच्या ध्यानीमनी नव्हते. या व्यक्तीने भूलथापा देत तिची आर्थिक फसवणूक केली. जोडीदार निवडताना खूपच सजग आणि जागरूक राहणे गरजेचे आहे, अन्यथा फसवणूक अटळ.
विवाह जुळविणार्या संकेतस्थळांचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. विवाह इच्छुक तरुणी, महिला, घटस्फोटित महिला या संकेतस्थळांवर ऑनलाईन नोंदणी करतात. याद्वारे अनेकांचे विवाह जुळत असले तरी विवाह संकेतस्थळांच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. अनेकदा गुन्हेगार संकेतस्थळांवर बनावट प्रोफाईल तयार करतात. तसेच प्रोफाईलमधील फोटो दुसर्याच व्यक्तीचा असतो. परदेशात चांगल्या पदावर काम करत आहे किंवा इंजिनिअर असल्याचे भासवले जाते. स्वतःच्या फ्लॅटसह मोठी संपत्ती असल्याच्या भूलथापा मारत महिलांना गुन्हेगार आपल्या जाळ्यात ओढतात. त्यांच्याकडून लाखो रुपये उकळतात.
फसवणूक झाल्यास…
बनावट प्रोफाईलबाबत विवाह संकेतस्थळाकडे तक्रार करा.
फसवणुकीबाबत लूलशीलीळाश.र्सेीं.ळप या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
पोलिस ठाण्यात तक्रार करा किंवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क करा.
हे लक्षात असू द्या…
कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका.
चुकीच्या व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही, याची खबरदारी घ्या. विवाह संकेतस्थळावरून लग्न जुळवत असाल तर मुलाची संपूर्ण चौकशी करा.
कामाच्या ठिकाणी जाऊन कामाविषयी खात्री करा.
प्रोफाईलमधील माहितीच्या आधारे कोणावरही तत्काळ विश्वास ठेवू नका.
कोणालाही पैसे देऊ नका, फसवणूक होऊ शकते. समोरच्या व्यक्तीला मोबाईल नंबर देणे टाळा.
ओळखपत्राची मागणी करा.
The post आपला जोडीदार निवडताना अडकाल फसवणुकीच्या रेशीमगाठीत appeared first on पुढारी.
सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : एखादी वस्तू आपण अत्यंत पारखून खरेदी करतो, मात्र विवाह जुळविणार्या संकेतस्थळावरन आयुष्याचा जोडीदार निवडताना सखोल चौकशी केली जात नाही. समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यावर आणि त्याच्या प्रोफाईलमधील माहितीवर विश्वास ठेवत मुली, महिला तत्काळ लग्नास होकार दर्शवतात. नंतर त्यांची आर्थिक फसवणूक होते. शिवाय नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे विवाह संकेतस्थळावरुन जोडीदार निवडताना काळजी …
The post आपला जोडीदार निवडताना अडकाल फसवणुकीच्या रेशीमगाठीत appeared first on पुढारी.
