आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल. मेष : पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे संपर्कक्षेत्र वाढेल. सकारात्‍मक लोकांसोबत वेळ व्‍यतित …

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो
श्रीगणेश सांगतात की, आज तुमचे संपर्कक्षेत्र वाढेल. सकारात्‍मक लोकांसोबत वेळ व्‍यतित कराल. मुले आणि कुटुंबासोबत खरेदीसाठी वेळ घालवू शकता. कोणताही निर्णय घाईगडबडीत घेवू नका, अन्‍यथा हा निर्णय बदलावा लागेल. काही काळ तणावपूर्ण परिस्थिती अनुभवू शकता. वैयक्तिक कामांकडे दुर्लक्ष झाल्‍याने अस्वस्थता वाटेल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येऊ शकतो.
वृषभ : भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याची योग्य वेळ
तुमच्या भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. आज तुम्ही सामाजिक कार्यात व्यस्त राहाल. महिलांना आपल्‍या जबाबदारीची जाणीव होईल. त्‍यांना यशही मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा अन्‍यथा घरातील वातावरण बिघडू शकते. अनावश्यक खर्च टाळा. त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, असा सल्‍ला श्रीगणेश देतात. आज अतिकामाचा ताण असेल. आरोग्‍याच्‍या तक्रारी कमी करण्‍यासाठी खाण्‍यावर नियंत्रण ठेवा.
मिथुन : यशासाठी संघर्ष करावा लागेल
आज सकारात्‍मक विचार कोणताही निर्णय घेण्‍यास मदत करु शकतो. चांगल्या लोकांशी संपर्कामुळे तुमच्यामध्ये नव काही शिकण्याची संधी मिळेल. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अशी सूचना श्रीगणेश करतात. अध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल. व्यवसायाच्या आघाडीवर यशासाठी संघर्ष करावा लागेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : सकारात्‍मक ग्रहस्‍थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्या
श्रीगणेश म्‍हणतात की, आजच्‍या सकारात्‍मक ग्रहस्‍थितीचा जास्तीत जास्त फायदा घ्या. कामात यश मिळाल्याने
उत्‍साह वाढेल. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. कोणत्याही यांत्रिक उपकरणांचा वापर जपून करा. विद्यार्थ्याचे अभ्‍यासाकडे दुर्लक्ष होईल. नोकरीच्या ठिकाणी देण्‍यात आलेली नवी जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकाल. आज थोडा वेळ कुटुंबासोबत व्‍यतित करा.
सिंह : धार्मिक कार्यात रुची वाढेल
आज धार्मिक कार्यात रुची वाढेल. प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. घर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुम्ही काही बदलांबाबत विचार कराल. आर्थिक व्‍यवहार करताना सावधगिरी आवश्‍यक तुमची फसवणूक होऊ शकते. वाद सामंजस्याने सोडवा. तुमच्या योजनांची कोणाशीही चर्चा करू नका, असे श्री गणेश सांगतात. वातावरणातील बदल तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात.
कन्या : आर्थिक बाजू चांगली असेल
भूतकाळातील चुकांमधून शिकत आज वर्तमान चांगला करण्‍याचा तुमचा विचार असेल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आनंद मिळवू शकता. आज वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रागावर नियंत्रण ठेवा. आज पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील.
तूळ : तुमच्यासाठी ग्रहमान अनुकूल
आज तुमच्यासाठी ग्रहमान अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. कोणतेही नवे काम सुरु करण्‍यासाठी चांगली वेळ आहे. घरातील ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. तरुणांनाही यश मिळण्यापासून दिलासा मिळू शकतो. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मालमत्ता आणि वाहन व्यवसायात सुधारणा होईल. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.
वृश्चिक : ध्येय साध्य करण्यासाठी यशस्वी व्हाल
आज महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्‍नशील राहिल्‍यास यशस्वी व्हाल. महत्त्वाच्या मुद्द्यांवर नातेवाईकांशी चर्चा होईल. शेजाऱ्यांशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो. चुकीच्‍या कामात आपला वेळ वाया घालवू नका. राजकीय कार्यात वाईट काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात अडचणी येतील.
धनु : मालमत्तेसंबंधीचा वाद मिटण्‍याची शक्‍यता
मालमत्तेसंबंधीचा वाद आज कोणाच्या तरी मध्यस्थीने शांततेने मिटण्‍याची शक्‍यता आहे. जवळच्या नातेवाईकाची भेट फायदेशीर ठरेल. आळस आणि राग टाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कोणत्याही कामात शांतपणे निर्णय घ्या, असे श्रीगणेश सांगतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहिल. पोटाविकाराच्या संबंधित काही समस्या जाणवतील.
मकर : वैवाहिक जीवनात वाद होऊ शकतात
अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज मेहनतीने पूर्ण होतील, असे श्रीगणेश सांगतात. राजकीय आणि सामाजिक कार्यातही तुमचे वर्चस्व दिसेल. मुलांच्या समस्यांवर तत्‍काळ उपाययोजना करा. सामाजिक उपक्रमांबरोबरच आपल्या कौटुंबिक जबाबदारांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. कोर्टात प्रलंबित केस असल्यास अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याने दूर करा. व्यवसायात योग्य क्रम ठेवा. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. वातावरणातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कुंभ : भावनेच्‍या आहारी जावून निर्णय घेवू नका
गणेश सांगतात की, विद्यार्थी अभ्यासावर आणि करिअरवर लक्ष केंद्रित करतील. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि कृपाही तुमच्यावर राहील. वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. आज अनोळखी व्‍यतीशी वाद होण्‍याची शक्‍यता. भावनेच्‍या आहारी जावून कोणताही निर्णय घेवू नका.
मीन : विचारात सकारात्मक बदल होऊ शकतो
आज तुम्ही तुमच्या कुटुंबाला पूर्ण वेळ द्याल. चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आज तुमच्या विचारात सकारात्मक बदल होऊ शकतो. कोणत्याही प्रकारच्‍०या अडचणीत कुटुंबातील सदस्यांकडून योग्य सहकार्य मिळेल. दुपारनंतर अशुभ बातमीमुळे तुम्हाला निराश वाटेल. तुमचे मनोबल खचू देऊ नका. अन्यथा, तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.