काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी; ‘या’ भागात ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच उकाड्यापासून दिलासा मिळण्यास सुरुवात झाली असून, गुरुवारी राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट, तसेच मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी विदर्भात गारपिटीसह पाऊस, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात अवकाळी पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, 13 मेपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी …
काळजी घ्या! राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी; ‘या’ भागात ‘यलो अलर्ट’ जारी

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच उकाड्यापासून दिलासा मिळण्यास सुरुवात झाली असून, गुरुवारी राज्याच्या बहुतांश भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट, तसेच मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. गुरुवारी विदर्भात गारपिटीसह पाऊस, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात अवकाळी पावसाने चांगली हजेरी लावली. दरम्यान, 13 मेपर्यंत राज्यात ‘यलो अलर्ट’ हवामान विभागाने जारी केला असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात अवकाळी जोरदार, तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस बरसणार आहे.
विशेषत: धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या भागांत अवकाळी बरसण्याचे प्रमाण जास्त राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात विदर्भात गारांसह पाऊस बरसला.
मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात चक्रीय स्थिती कार्यरत आहे. याचबरोबर द्रोणीय स्थिती दक्षिण कर्नाटकपर्यंत कार्यरत आहे. याशिवाय वायव्य राजस्थानपासून विदर्भापर्यंत आणखी एक द्रोणीय स्थिती आहे. या तीनही स्थितींचा प्रभाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागात अवकाळी पाऊस बरसण्यास सुरुवात झाली आहे. 13 मेपर्यंत सर्वच भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पाऊस बरसण्यास सुरुवात झाली असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट झाली आहे.
हेही वाचा

गोंदिया : पत्नी, मुलासह सासऱ्याला जिवंत जाळणाऱ्या आरोपीला फाशी
कोल्हापूर : शिये फाटा बनला मृत्यूचा सापळा; शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष
वर्धा : घरगुती वादातून पतीची गळा आवळून हत्या; पत्नीला अटक