तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच : पंतप्रधान मोदी

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणाचा भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहबुबाबाद येथील जाहीर सभेत सोमवारी केला. तेलंगणा दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, केसीआर यांची पुनरावृत्ती तेलंगणातील जनता करणार नाही. तिरुपती (आंध्र प्रदेश) येथून भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांची तेलंगणातील ही पहिली सभा होती. (Prime Minister Modi) बीआरएस … The post तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच : पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.
#image_title

तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच : पंतप्रधान मोदी

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणाचा भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहबुबाबाद येथील जाहीर सभेत सोमवारी केला. तेलंगणा दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, केसीआर यांची पुनरावृत्ती तेलंगणातील जनता करणार नाही. तिरुपती (आंध्र प्रदेश) येथून भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांची तेलंगणातील ही पहिली सभा होती. (Prime Minister Modi)
बीआरएस (भारत राष्ट्र समिती) नेते तथा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांना भाजपसोबत युती करायची होती. त्यासाठी मला भेटायला ते दिल्लीतही आले होते. युती करा, युती करा म्हणून विनंतीही त्यांनी केली. पण अनेक कारणांनी आम्ही त्यांचीही ऑफर धुडकावून लावली. जनता समजदार आहे, ही कारणे कोणती होती, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. बीआरएस तसेच काँग्रेसने मिळून तेलंगणा राज्य भकास केले आहे. हे दोन्ही पक्षच या राज्यातील समस्यांचे मूळ आहेत. काँग्रेसच्या समस्येचे निराकरण म्हणून येथील लोकांनी बीआरएसला साथ दिली. दहा वर्षे आजमावले. आता बीआरएस या समस्येचे निराकरण म्हणून लोक पहिल्या समस्येकडे उपाय म्हणून नक्कीच पाहाणार नाहीत. धर्माच्या नावाखाली विशिष्ट समाजघटकांचे तुष्टीकरण, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराचे दुष्कर्म या दोन्ही पक्षांना पुढेही चालू ठेवायचे आहे. त्यामुळे भाजप हाच एक पर्याय असल्याचे येथील लोकांना दिसते आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
दोन्ही पक्षांनी दलितांचा विश्वासघात केला आहे. मागासवर्गीयांना खर्‍या अर्थाने न्याय केवळ भाजपच देऊ शकते. तेलंगणात भाजपचा पहिला मुख्यमंत्रीही याच समाजघटकातून असेल, हे वचन भाजपने आधीच दिलेले आहे. भाजपचे सरकार राज्यात आल्यानंतर केसीआर यांनी केलेले सर्व घोटाळे बाहेर काढणार, सर्व घोटाळ्यांचा कसून तपास करणार, असे आश्वासन त्यांनी दिले. (Prime Minister Modi)
हेही वाचा :

तेलंगणात केसीआर सरकारला झटका!
अवकाळीचा निम्म्या महाराष्ट्राला फटका
Dengue : डेंग्यूने वाढवली चिंता; प्लेटलेटसाठी धावाधाव

The post तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच : पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.

हैदराबाद; वृत्तसंस्था : तेलंगणाचा भावी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहबुबाबाद येथील जाहीर सभेत सोमवारी केला. तेलंगणा दौर्‍याच्या तिसर्‍या दिवशी जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले, केसीआर यांची पुनरावृत्ती तेलंगणातील जनता करणार नाही. तिरुपती (आंध्र प्रदेश) येथून भगवान व्यंकटेश्वराचे दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांची तेलंगणातील ही पहिली सभा होती. (Prime Minister Modi) बीआरएस …

The post तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच : पंतप्रधान मोदी appeared first on पुढारी.

Go to Source