चीनने बनविले अंतराळ सैन्यदल!
बीजिंग/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : आण्विक क्षेपणास्त्रांचे भूमिगत केंद्र असलेल्या अमेरिकेतील मोंटाना या भागात चालू वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीत 20 कि.मी. उंचीवर चीनचा बलून आढळला होता. अमेरिकेने तो पाडलाही. अशा अनेक घटना आणखी समोर आल्या. चीनच्या या बलून्सचा संबंध चीनच्या अंतराळ सैन्यदलाशी असल्याचे आता समोर आले आहे. चीनने नियर स्पेस फोर्सच्या (अंतराळ सैन्यदल) रूपात सैन्याचे पाचवे दल सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. (Space Army)
अमेरिकन हवाईदलाने एफ-22 रॅप्टर विमानाने चीनचा एक बलून अटलांटिक महासागरात पाडला होता. आता या बलून्सचा संबंध चीनच्या अंतराळ लष्कराशी असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे, चीनच्याच संरक्षण तंत्रज्ञान राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांनी, चीनने नियर स्पेस फोर्स तयार केल्याचा दावा केला आहे. एका शोधनिबंधातील या दाव्याचा संबंध आता जगभरात ठिकठिकाणी आढळलेल्या बलूनशी जोडला जातो आहे. लष्कर, हवाईदल, नौदल अशी सैन्याची तीन दले जगभरातील बहुतांश लहान-मोठ्या देशांकडे असतात. चीनने मात्र रॉकेट फोर्सनंतर नियर स्पेस फोर्सच्या रूपात सैन्याचे पाचवे दल सुरू केलेले आहे. अमेरिकेने 2019 मध्येच स्पेस फोर्स तयार केलेली आहे. (Space Army)
अमेरिकेच्या माहितीनुसार, अलीकडच्या वर्षांत, चीनने 5 खंडांतील 40 हून अधिक देशांमध्ये अमेरिकेतील मोंटानात पाठविले होते तसे 24 वर स्पाय बलून पाठवले आहेत. भारतातही चीनने असे काही बलून सोडलेले आहेत. हे बलून हवामानाचा वेध घेण्यासाठी होते आणि ते भरकटले, असा दावा अमेरिकेच्या आरोपानंतर चीनकडून करण्यात आला होता.
अर्थात, याउपर अमेरिकेने चीनचे असे सारे बलून अद्ययावत अस्त्रांचा वापर करून पाडले होतेच. नव्या दाव्यांमुळे चीनचे हे स्पाय बलून नुसता योगायोग नव्हता, तर तो अंतराळ सैन्याशी संबंधित प्रयोगच असल्याचे आता बोलले जात आहे.
लष्कर, नौदल, हवाईदल आणि रॉकटदलानंतर नियर स्पेस फोर्स हे चीनचे पाचवे सैन्यदल ठरले असून, नियर स्पेस फोर्समध्ये ड्रोन, स्पाय बलून आणि हायपरसॉनिक शस्त्रांचा ताफा आहे. जमिनीपासून 50 कि.मी.वरून हेरगिरीसह हल्लेही या फोर्सच्या माध्यमातून शक्य आहेत.
हेही वाचा :
Dengue : डेंग्यूने वाढवली चिंता; प्लेटलेटसाठी धावाधाव
अवकाळीचा निम्म्या महाराष्ट्राला फटका
अक्कलकोटहून निघालेली भाविकांची चारचाकी औट्रम घाटात दरीत कोसळली, दुर्घटनेत ४ ठार, ७ जखमी
The post चीनने बनविले अंतराळ सैन्यदल! appeared first on पुढारी.
बीजिंग/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : आण्विक क्षेपणास्त्रांचे भूमिगत केंद्र असलेल्या अमेरिकेतील मोंटाना या भागात चालू वर्षाच्या सुरुवातीला फेब्रुवारीत 20 कि.मी. उंचीवर चीनचा बलून आढळला होता. अमेरिकेने तो पाडलाही. अशा अनेक घटना आणखी समोर आल्या. चीनच्या या बलून्सचा संबंध चीनच्या अंतराळ सैन्यदलाशी असल्याचे आता समोर आले आहे. चीनने नियर स्पेस फोर्सच्या (अंतराळ सैन्यदल) रूपात सैन्याचे पाचवे दल सुरू …
The post चीनने बनविले अंतराळ सैन्यदल! appeared first on पुढारी.