बलुचिस्तानच्या ग्वादारमध्ये दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, ७ ठार
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या ग्वादारमध्ये बुधवारी रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ कामगार ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या ARY न्यूजच्या वृत्तानुसार, “बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी ग्वादरच्या सरबंद येथील फिश हार्बर जेट्टीजवळील निवासी वस्तीवर हल्ला केला. त्यांनी या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार केला. यात ७ कामगार ठार झाले.
Pakistan’s ARY News reports, “Seven workers were killed in a terrorist attack in Gwadar in the wee hours of Wednesday night. As per details, terrorists attacked residential quarters near Fish Harbour Jetty in Sarband, Gwadar and opened indiscriminate fire. As a result, seven…
— ANI (@ANI) May 9, 2024
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी ग्वादरच्या सरबंदमधील फिश हार्बर जेट्टीजवळील निवासी वस्तीवर हल्ला केला. यात झोपेत असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. पोलिसांनी सांगितले की, मृत कामगार आणि एकजण जखमी हे पंजाबमधील खानेवाल येथील रहिवासी आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी छापेमारी सुरू केली आहे. गेल्या वर्षी केच, तुर्बत येथील भागात अज्ञात सशस्त्र हल्लेखोरांनी पंजाबमधील सहा मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली होती. इतर दोघे जखमी झाले होते. “या हल्ल्यात ६ जण जागीच ठार झाले तर उर्वरित दोघे गंभीर जखमी झाले होते,” असे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने सांगितले होते.
बलुचिस्तानचे मुख्यमंत्री मीर सर्फराज बुगती यांनी ग्वादरमधील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांना या हल्ल्याची ‘खुला दहशतवाद’ अशा शब्दांत निंदा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, दोषींना सोडले जाणार नाही आणि गोळीबारात मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांच्या मागे आम्ही खंबीर उभे आहोत.
“आम्ही दहशतवादी आणि त्यांच्या सूत्रधारांचा माग काढू,” असे बुगती यांनी म्हटले आहे. तर बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर झिया उल्लाह लांगाऊ म्हणाले की, “निर्दोष मजुरांची हत्या हा भ्याड हल्ला आहे”.
हे ही वाचा :
कुलगाममधील चकमकीत ३ दहशतवादी ठार, ४० तास चालले सर्च ऑपरेशन
भारतातील लोकसभा निवडणूक अस्थिर करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न : रशियाचा खळबळजनक दावा