अक्षय्य तृतीयेसाठी नाशिककरांची जय्यत तयारी

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीया शुक्रवारी (दि. १०) साजरी करण्यात येणार आहे. अक्षय्य तृतीयेसाठी नाशिककरांनी जय्यत तयारी केली आहे.
हिंदू सणांपैकी प्रमुख एक सण असलेल्या अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. अक्षय्य तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी किंवा तृतीया तिथीला साजरी केली जाते. या दिवशी प्रारंभ केलेल्या शुभ कार्य अक्षय पावते, अशी मान्यता आहे. यंदाच्या वर्षी शुक्रवारी (दि.१०) अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जाणार आहे. त्यामुळे पुजेसाठी आवश्यक सुगड, विविध प्रकारचे धान्यासह अन्य साहित्य घेण्यासाठी बाजारात लगबग पाहायला मिळते आहे. तसेच या दिवशी नवैद्यामध्ये आंबा रसाला अधिक महत्व आहे. अवघ्या एका दिवसावर हा सण येऊन ठेपल्याने आंबे भाव खाऊन जात आहे.
लक्ष्मी-कुबेराची पुजन
विधी हा दिवस नवीन सुरुवातीसाठी, विशेषतः विवाह, प्रतिबद्धता आणि इतर गुंतवणूकीसाठी शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीया हा हिंदू संस्कृतीत एक शुभ दिवस मानला जातो आणि समृद्धीच्या अनंत विपुलतेचे प्रतिनिधित्व करतो. देवतांना प्रार्थना करणे हा देखील विधीचा एक भाग आहे. या दिवशी, मंदिरे सजविली जातात, विशेष पूजा केली जाते, लोक भगवान कुबेर आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात. या दिवशी दानधर्माला अधिक महत्व असते.
पुजा मुहूर्त असा…
सकाळी ५ वाजून १३ मिनिटांपासून ते सकाळी ११ वाजून ४३ मिनिटांपर्यत.
हेही वाचा:
Akshay Tritiya: साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहुर्तावर ‘सोनेरी’ झळाळी
Akshay Tritiya 2024 | अक्षय तृतीया शुक्रवारी, जाणून घ्या शुभमुहूर्त आणि पूजाविधी
Gold and Silver Price Today | ‘अक्षयतृतीया’आधी सोने-चांदी दरात बदल, जाणून घ्या नवे दर
