केदारनाथ धाम उद्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले

पुढारी ऑनलाईन डेस्क : केदारनाथ धामचे दरवाजे अक्षय तृतीया दिवशी उद्याापासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले होत आहेत. उद्या शुक्रवार (दि.१० मे) रोजी (Kedarnath Dham) पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने मंदिर उघडणार आहे. यासाठी जोरदार तयारी केली जात असून, केदारनाथ मंदिर ४० क्विंटल फुलांनी सजवले जात आहे. या संदर्भातील माहिती बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिली …

केदारनाथ धाम उद्यापासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : केदारनाथ धामचे दरवाजे अक्षय तृतीया दिवशी उद्याापासून भाविकांच्या दर्शनासाठी खुले होत आहेत. उद्या शुक्रवार (दि.१० मे) रोजी (Kedarnath Dham) पूजा आणि वैदिक मंत्रोच्चाराने मंदिर उघडणार आहे. यासाठी जोरदार तयारी केली जात असून, केदारनाथ मंदिर ४० क्विंटल फुलांनी सजवले जात आहे. या संदर्भातील माहिती बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी दिली आहे.
भगवान केदारनाथची पंचमुखी डोली सोमवार श्री विश्वनाथ मंदिर गुप्तकाशी येथून देवडोली मुक्कामासाठी श्री ओंकारेश्वर मंदिर उखीमठ येथे पोहोचली. मंगळवारी (दि.७ मे) ही डोली फाटा येथे दुसऱ्या मुक्कामासाठी पोहचली. त्यानंतर बुधवार ८ मे रोजी सकाळी फाटा येथून गौरीकुंड येथे पंचमुखी डोली तिसरा मुक्काम करणार आहे. भगवान केदारनाथची पंचमुखी डोली आज (दि.९ मे) सकाळी ८.३० वाजता गौरामाई मंदिर गौरीकुंड येथून (Kedarnath Dham) केदारनाथ धामसाठी निघाली आहे. गौरीकुंडातून केदारनाथ धाम मंदिराकडे या डोलीच्या प्रस्थान झाले असून, उद्या सकाळी ७ पर्यंत ती पोहचणार आहे. सकाळी ७ वाजताच्या दरम्यान बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात येणार असून, यावेळीपासून मंदिर दर्शनासाठी खुले केले जाणार आहे. अशी माहिती देखील बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर प्रशासनाने दिली आहे.

#WATCH | Uttarakhand: Lord Kedarnath’s Panchmukhi Doli departed for Kedarnath Dham from its third stop Gauramai Temple Gaurikund today at 8.30 am.
On 6th May, the Devdoli reached Shri Omkareshwar Temple Ukhimath from Shri Vishwanath Temple Guptkashi for its stay and reached its… pic.twitter.com/kiq5tpmyYr
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 9, 2024

हेही वाचा:

बिस्किटांपासून बनवली केदारनाथ मंदिराची प्रतिकृती
Kedarnath Dham : पिवळ्या-केशरी झेंडू फुलांनी केदारनाथ धाम सजले; पाहा व्हिडिओ
राहुल गांधी यांनी घेतले केदारनाथाचे दर्शन

Go to Source