एअर इंडिया एक्सप्रेसची मोठी कारवाई, सामुहिक रजेवर गेलेले २५ कर्मचारी बडतर्फ

पुढारी ऑनलाईन डेस्क : एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सने सामुहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आजरपणाच कारण देत सामुहिक रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतल्याने एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. Around 25 employees (cabin crew …

एअर इंडिया एक्सप्रेसची मोठी कारवाई, सामुहिक रजेवर गेलेले २५ कर्मचारी बडतर्फ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सने सामुहिक रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. आजरपणाच कारण देत सामुहिक रजेवर गेलेल्या २५ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतल्याने एअर इंडिया एक्सप्रेसची अनेक उड्डाणे रद्द करावी लागली होती. त्यामुळे विमान प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

Around 25 employees (cabin crew members) of Air India Express Airlines have been terminated after they didn’t report to work, and due to their behaviour, thousands of passengers suffered: Airline Sources
— ANI (@ANI) May 9, 2024

एअर इंडिया एक्स्प्रेसचे वरिष्ठ कर्मचारी अचानक सामुहिक रजेवर गेल्याने ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान उड्डाणे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत रद्द केली होती. “आमच्या केबिन क्रूच्या एका विभागाने अचानक शेवटच्या क्षणी आजारी असल्याची नोंद केली. परिणामी, विमान उड्डाणांना विलंब झाला असून ती रद्द करण्यात आली आहेत. या घटनांमागील कारणे समजून घेण्यासाठी आम्ही क्रूशी चर्चा करत आहोत. आमच्या टीम्स सक्रियपणे या समस्येकडे लक्ष देत आहेत. या अनपेक्षित व्यत्ययामुळे आमच्या प्रवाशांना झालेल्या कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत. विमान उड्डाणे रद्द झाल्यानंतर संबंधित प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत केले जातील. तसेच वेळापत्रकात बदल केला जाईल. विमानतळावर जाण्यापूर्वी विमान सेवा सुरु आहे की नाही, हे तपासावे”, असे एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्यानी बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते.
हेही वाचा : 

हरियाणातील नायबसिंह सैनी सरकार अडचणीत; JJPची काँग्रेसला खुली ऑफर
सॅम पित्रोदांच्‍या वादग्रस्‍त विधानांवर काँग्रेसने ‘हात’ झटकले

Go to Source