नाशिक : ‘राज्य पुरातत्व-संग्रहालय’ च्या महिला अधिकाऱ्याला दीड लाखाची लाच घेताना अटक

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाखाची लाच घेताना ‘लाचलुचपत’ने मंगळवारी (दि.७) रंगेहाथ अटक केली. तसेच विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार …
नाशिक : ‘राज्य पुरातत्व-संग्रहालय’ च्या महिला अधिकाऱ्याला दीड लाखाची लाच घेताना अटक

नाशिक; Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्य पुरातत्व आणि संग्रहालय संचालनालयाचे नाशिक येथील पुरातत्व विभागाच्या सहायक संचालक संशयित आरती मृणाल आळे (४१,रा.अनमोल नयनतारा, राणेनगर) यांना दीड लाखाची लाच घेताना ‘लाचलुचपत’ने मंगळवारी (दि.७) रंगेहाथ अटक केली. तसेच विभागाचे संचालक डॉ. तेजस मदन गर्गे यांनी लाचेच्या रकमेतून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांना पेठरोड परिसरात कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिक सहायक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. यासाठी तक्रारदार यांनी सरकारवाड्याच्या प्राचीन वास्तूत कार्यरत असलेल्या सहायक संचालक पुरातत्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र तक्रारदार यांना देण्याच्या मोबदल्यात पुरातत्व विभाग नाशिक येथील सहाय्यक संचालक आरती मृणाल आळे यांनी सोमवारी (दि.६) दीड लाख रूपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आळे यांच्याविरोधात तक्रार केली. ‘लाचलुचपत’च्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांच्या आदेशनुसार तक्रारीची शहानिशा करून सापळा रचण्यात आला. मंगळवारी (दि.८) लाच स्वीकारताना संशयित आळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. दरम्यान, आळे यांनी पुरातत्व विभागाचे राज्याचे संचालक तेजस मदन गर्गे यांना लाच घेतल्याची माहिती देत त्यांच्या हिश्याचे पैसे कोणाकडे देऊ, असे विचारले असता गर्गे यांनी लाच स्वीकारण्याची संमती दर्शवली. त्यामुळे गर्गे यांच्याविरोधातही इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम बुधवारी सुरु होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक एन. बी. सूर्यवंशी व सुवर्णा हांडोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
 
 हेही वाचा :

Gondiya : तर… विद्यार्थी राहणार शिक्षणापासून वंचित !
कोल्हापूर : डंपरच्या धडकेत स्टेनो टायपिस्ट महिला कर्मचारी ठार
दिल्लीत उपचाराच्या नावाखाली लाच घेणा-या दोन डॉक्टरांसह 9 जणांना अटक, CBIची कारवाई