३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता

उत्तर काशी : सियालक्यारा बोगद्यात गेल्या 16 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी 360 डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi Tunnel) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, सोमवारी 36 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम करण्यात आले. दरम्यान, 12 रॅट  होल मायनर्सनी (कोळसा खाणीत काम करणारे) बोगद्यात अरुंद भुयार तयार करण्याचे काम सुरू … The post ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता appeared first on पुढारी.
#image_title

३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता

उत्तर काशी : सियालक्यारा बोगद्यात गेल्या 16 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी 360 डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi Tunnel) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, सोमवारी 36 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम करण्यात आले. दरम्यान, 12 रॅट  होल मायनर्सनी (कोळसा खाणीत काम करणारे) बोगद्यात अरुंद भुयार तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
100 तासांत सुटका

बोगद्यावरील टेकडीवरून व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी (उभा छेद) लष्करातील जवानांना पाचारण करण्यात आले आहे. मद्रासमधील लष्करातील इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचावकार्यात कोणताही अडथळा न आल्यास 100 तासांत मजुरांची सुटका होऊ शकते, असेही सूत्रांनी सांगितले. (Uttarkashi Tunnel)

मजुरांचे मनोबल वाढविणार
आपत्ती निवारण विभागाचे सदस्य (एनडीआरएफ) माजी लेफ्टनंट जनरल सैयद अता हैसनन यांनी बचावकार्य सुरळीत सुरू असून, चिंतेचे कारण नसल्याचे सांगितले. बोगद्यातील मजुरांना अन्न आणि औषधपुरवठा केला जात आहे. शिवाय, त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नातेवाईकांसह बचावकार्यातील अधिकारी मजुरांना धीर देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव डॉ. पी. के. मिश्र यांनी आढावा घेतला.  (Uttarkashi Tunnel)

हे असतील पर्याय

 बोगद्याला समांतर छेद देण्याच्या पर्यायावरही विचार सुरू आहे. विशिष्ट अंतरापर्यंत हाताने समांतर (हॉरिझाँटल) खोदकाम करण्यात येणार आहे.
 बोगद्याच्या विरुद्ध दिशेकडून खोदकामाचाही पर्याय आहे. बोगद्याच्या विरुद्ध दिशेला बारकोट हे ठिकाण आहे. या ठिकाणापासून मजूर 480 मीटर अंतरापर्यंत आतवर आहेत.
मुख्य बोगद्याच्या डाव्या बाजूला छोटा बोगदा खणण्याचा विचारही सुरू आहे. यासाठी 180 मीटर लांब खोदकाम करावे लागणार आहे.
व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी 60 ते 86 मीटरपर्यंत खोदकाम करावे लागणार आहे. रविवारपासून सोमवारपर्यंत साधारण 36 मीटरपर्यंत आतवर खोदकाम झाले आहे.

मजुरांशी असा  होतो संवाद…
ऑडिओ कम्युनिकेशन सेटअप आणि बीएसएनएलच्या टेलिफोनिक कम्युनिकेशन्स सिस्टीमद्वारे बोगद्यातील मजुरांशी संपर्क साधून संवाद साधला जात आहे.
प्लाज्मा, लेसरची मदत घेणार…
बोगद्यातील पाईपमध्ये ऑगर मशिनचे पार्टस् अडकले आहेत. या मशिनचे तुटलेले भाग काढण्याचे काम सुरू आहे. प्लाज्मा आणि लेसर कटरद्वारे अडकलेल्या भागाचे कटिंग करण्यात येत आहे. ऑगर मशिनद्वारे बोगद्यात साधारणत: 46 मीटरपर्यंत खोदकाम झाले होते. दिल्ली आणि झांसीमधून आलेल्या 12 रॅट होल मायनर्सनी काम सुरू केले आहे.

हेही वाचा :

 Foxconn : फॉक्सकॉन भारतामध्ये गुंतवणार दीड अब्ज डॉलर
Maratha Reservation| आरक्षणप्रश्नी भुजबळांची जी भूमिका, तीच सरकारची : मुख्यमंत्री शिंदे
कोल्हापूर : पुणे-बेंगलोर महामार्गावरील मंगरायाचीवाडी येथे अपघात, ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू

The post ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता appeared first on पुढारी.

उत्तर काशी : सियालक्यारा बोगद्यात गेल्या 16 दिवसांपासून अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी 360 डिग्री सेल्सिअसमध्ये युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. (Uttarkashi Tunnel) बोगद्याच्या सर्व भागांकडून खोदकामावर विचार सुरू असून, सोमवारी 36 मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंगचे (उभा छेद) काम करण्यात आले. दरम्यान, 12 रॅट  होल मायनर्सनी (कोळसा खाणीत काम करणारे) बोगद्यात अरुंद भुयार तयार करण्याचे काम सुरू …

The post ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग; १०० तासांत सुटका होण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Go to Source