वाशिम: मारसूळ येथून शेतमाल चोरणाऱ्या ५ जणांना अटक; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम, पुढारी वृत्तसेवा: मारसूळ (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील शेतकऱ्याच्या गोडाऊनमधून २७ एप्रिलरोजीच्या रात्री शेतमाल चोरणाऱ्या ५ चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८.९0 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. या प्रकरणी अरुणराव शंकरराव घुगे (वय ५२, रा. मारसूळ, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अटक …

वाशिम: मारसूळ येथून शेतमाल चोरणाऱ्या ५ जणांना अटक; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाशिम, Bharat Live News Media वृत्तसेवा: मारसूळ (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील शेतकऱ्याच्या गोडाऊनमधून २७ एप्रिलरोजीच्या रात्री शेतमाल चोरणाऱ्या ५ चोरट्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ८.९0 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. या प्रकरणी अरुणराव शंकरराव घुगे (वय ५२, रा. मारसूळ, ता. मालेगाव, जि. वाशिम) यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अटक केलेल्यांची नावे खालीलप्रमाणे –
शुभम मधुकर खंडारे (वय २६), आकाश वसंत खंडारे (वय), सोनू प्रभू लठाड ( वय २७) , श्याम शिलपत पवार (वय २४, सर्व रा. चिखली, ता. मंगरूळपीर, जि.वाशिम) स्वप्नील देवानंद जाधव, (वय २०, रा. रामराववाडी, ता. मंगरूळपीर, जि.वाशिम) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८. ९० लाखांचा मुद्देमाल जप्त
त्यांच्याकडून एकूण २७ क्विंटल सोयाबीन अंदाजे किंमत १ लाख १८ हजार ८०० रूपये, १६ क्विंटल हरभरा ७३ हजार ६०० रूपये, १८ क्विंटल तूर १ लाख ९८ हजार आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन (MH 30 BD 5054) असा एकूण ८. ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, योगेश धोत्रे, पोलीस अंमलदार प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, दिपक घुगे, विठ्ठल महाले व संदीप डाखोरे यांनी केली.
हेही वाचा 

वाशिम: पातूरमध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबियांच्या गाडीचा अपघात; ६ ठार, ४ जण जखमी
JEE Main Result : जेईई मेन सेशन २ मध्ये शेतकऱ्याच्या मुलाचा डंका; वाशिममधील निलकृष्ण गजरे देशात पहिला
वाशिम: किन्हीराजा गावाजवळ ट्रक उलटून चालक ठार