हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतील. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने या भेटीला विशेष महत्व असून यावेळी महायुतीमधील विविध घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तीनही पक्षांचा …

हेमंत गोडसे भुजबळांच्या भेटीला, काय झालं बोलणं?

नाशिक Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना महायुतीचे उमेदवार खा. हेमंत गोडसे यांनी आज राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतील. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने या भेटीला विशेष महत्व असून यावेळी महायुतीमधील विविध घटकपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नाशिकच्या जागेवर महायुतीमधील तीनही पक्षांचा दावा होता. त्यात छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, उमेदवारी जाहीर करण्यात झालेला विलंब पाहाता भुजबळांनी निवडणूकीतून माघार घेतली. त्यानंतर वाटाघाटीत नाशिकची जागा शिंदे गटाला गेल्याने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनाच पुन्हा उमेदवारी जाहीर झाली. मात्र, महायुतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप तीनही पक्ष एकत्र असल्याने भुजबळही गोडसे यांच्या प्रचारात दिसणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर हेमंत गोडसे यांनी भुजबळ फार्मवर जाऊन छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे.
यापूर्वी गोडसे यांनी छगन भुजबळ यांचा 2014 व समीर भुजबळ यांचा 2019 च्या लोकसभा निवडणूकीत पराभव केला होता. मात्र, आता तेच भुजबळ महायुतीत असल्याने गोडसे यांचा प्रचार करताना दिसणार आहेत.
हेही वाचा –

मतदान यंत्रे बंद पडल्याने नागरिकांची नाराजी; बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रकार
Maharashtra Election | पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर, १० जूनला मतदान