“शहजादे, तुम्‍हाला उत्तर द्यावे लागेल” : पित्रोदांच्‍या टिपण्‍णीवर PM मोदी भडकले

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : “मला शिवीगाळ करता ते मी सहन करु शकतो;परंतू माझ्‍या देशवासीयांच्‍या त्‍वचेच्‍या रंगावरुन शिवीगाळ केली जाते ती सहन केले जाणार नाही. त्वचेच्या रंगावर आधारित आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकतो का?, असा सवाल करत आज मला खूप राग आला आहे. त्वचेच्या रंगावरून ते देशवासियांना शिवीगाळ करत आहेत. त्वचेचा अपमान देश सहन करणार …
“शहजादे, तुम्‍हाला उत्तर द्यावे लागेल” : पित्रोदांच्‍या टिपण्‍णीवर PM मोदी भडकले


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : “मला शिवीगाळ करता ते मी सहन करु शकतो;परंतू माझ्‍या देशवासीयांच्‍या त्‍वचेच्‍या रंगावरुन शिवीगाळ केली जाते ती सहन केले जाणार नाही. त्वचेच्या रंगावर आधारित आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकतो का?, असा सवाल करत आज मला खूप राग आला आहे. त्वचेच्या रंगावरून ते देशवासियांना शिवीगाळ करत आहेत. त्वचेचा अपमान देश सहन करणार नाही. याचे उत्तर काँग्रेसच्‍या शहजादे (राहुल गांधी) तुम्‍हाला उत्तर द्यावे लागेल.” अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्‍या वादग्रस्‍त विधानावर निशाणा साधला.
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात आयोजित प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्‍हणाले की,. मला शिवीगाळ करता ते मी सहन करु शकतो;परंतू माझ्‍या देशवासीयांच्‍या त्‍वचेच्‍या रंगावरुन शिवीगाळ केली जाते ती सहन केले जाणार नाही. त्वचेच्या रंगावर आधारित आपण एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता ठरवू शकतो का? याचे उत्तर काँग्रेसच्‍या राजपुत्राला (राहुल गांधी) द्यावे लागेल.
काँग्रेसचे लोक भिंग लावून जागा शोधत आहेत. चौथ्या टप्प्यात काँग्रेसचा नेहमीचा भिंग पुरेसा होणार नाही. काँग्रेसला जागा शोधण्यासाठी मायक्रोस्कोप लागेल, असा टोलाही त्‍यांनी लगावला.आज जगतील विविध देशांमध्‍ये अस्थिरता, अशांतता, संकट आहे. अशा परिस्थितीत भारताचे नेतृत्त्‍व चुकीच्या हाती देता येईल का? असा सवालही त्‍यांनी केला.

#WATCH | Addressing a public gathering in Warangal, Telangana, PM Modi says “…’Shehzade aapko jawaab dena padega’. My country will not tolerate the disrespect of my countrymen on the basis of their skin colour and Modi will never tolerate this…” pic.twitter.com/e22GgRbctj
— ANI (@ANI) May 8, 2024

काम म्‍हणाले होते सॅम पित्रोदा?
सॅम पित्रोदांनी एका माध्‍यम समुहाशी बोलताना भारतीयांच्या दिसण्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. ते म्हणाले की, ईशान्य भारतातील लोक चिनीसारखे दिसतात. दक्षिण भारतीय हे आफ्रिकन लोकांसारखे आहेत. तर उत्तर भारतीय काहीसे गोरे आहेत. आतापर्यंत जशी विविधतेत एकता आहे तशीच आपण टिकवून ठेवू शकतो.
‘भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेवू शकतो. पूर्व भारतातील लोक चीनसारखे दिसतात. पश्चिमेकडील लोक अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडील लोक गोरे दिसतात आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात. काही फरक पडत नाही. आपण सर्व एक भावा-बहिणी आहोत. भारतातील लोक भाषिक, धार्मिक आणि खाद्य विविधतेचा आदर करतात, जी प्रत्येक प्रदेशानुसार बदलते. माझा फक्त या भारतावर विश्वास आहे. जिथे प्रत्‍येक नागरिकासाठी स्‍थान आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी मिळते. भारताच्या लोकशाही, स्वातंत्र्य आणि उदारतेच्या कल्पनेला आज राम मंदिरामुळे आव्हान दिले जात आहे, असा दावाही त्‍यांनी केला.
सॅम पित्रोदांच्‍या वादग्रस्‍त विधानावर काँग्रेसने ‘हात’ झटकले
जयराम रमेश यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म X हँडलवर म्‍हटलं आहे की, ” सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेचे वर्णन करण्यासाठी देशातील लोकांचे कलेले वर्णन अत्यंत दुर्दैवी आणि अस्वीकार्य आहेत. या विधानापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वतःला पूर्णपणे वेगळे करते.”
हेही वाचा : 

‘शेहजादा’ला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावीळ : PM मोदींचा राहुल गांधींवर हल्‍लाबोल
PM Narendra Modi Sabha Pune : जो कहते हैं, वो करते हैं, वह मोदी हैं : मुख्यमंत्री शिंदे

 

Go to Source