पतीच्या जाचाला कंटाळून पोटच्या दोन मुलींसह आईने संपविले जीवन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पती व सासरच्या नातलगांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन व आठ वर्षांच्या मुलींना गळफास देऊन स्वत:ही इमारतीच्या चौथा मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. आडगाव येथील इच्छामणी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली. अश्विनी स्वप्निल निकुंभ (30), अगस्त्या स्वप्नील निकुंभ (2) व आराध्या स्वप्नील निकुंभ (8, तिघे रा. …

पतीच्या जाचाला कंटाळून पोटच्या दोन मुलींसह आईने संपविले जीवन

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- पती व सासरच्या नातलगांच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन व आठ वर्षांच्या मुलींना गळफास देऊन स्वत:ही इमारतीच्या चौथा मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. आडगाव येथील इच्छामणी नगर, नांदूर जत्रा लिंक रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली.
अश्विनी स्वप्निल निकुंभ (30), अगस्त्या स्वप्नील निकुंभ (2) व आराध्या स्वप्नील निकुंभ (8, तिघे रा. हरीवंदन सोसायटी, कोणार्क नगर) अशी मृतांची नावे आहेत. अश्विनी हिने जीवन संपविण्यापूर्वी पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओ बनवून सांगितले. तसेच अश्विनीने मृत्यू पूर्वी चिट्ठी लिहिली आहे. अश्विनीने केलेल्या आरोपानुसार पती स्वप्नील याने वेळोवेळी त्रास दिला. पती स्वप्नील याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तसेच पतीचा भाऊ तेजस व बहीण मयुरी हिच्यासोबत वाद झाल्याने पतीने वारंवार शारीरिक व मानसिक त्रास दिला. सततच्या त्रासाला कंटाळून अश्विनीने दोन्ही मुलींना गळफास दिला. यात मंगळवारी रात्री दोन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचा संशय असून बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास अश्विनीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. याप्रकरणी आडगाव पोलीस तपास करीत आहेत.
अश्विनीने मृत्यू पूर्वी चिट्ठी लिहिली आहे.
हेही वाचा –

Onion News | निर्यात शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्व नाही, दोन पैसै पदरात पडू द्या शेतकऱ्यांची सरकारला साद
वेल्हेत जिल्हा बँकेच्या शाखेने केला रात्रीचा दिवस : शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल