सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण: सागर पाल, विकी गुप्ताला न्यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिलरोजी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी विशेष मोका न्यायालयाने २ संशयित आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला राजस्थानमधून मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती.  Salman Khan residence firing सलमान खानच्या …

सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण: सागर पाल, विकी गुप्ताला न्यायालयीन कोठडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर १४ एप्रिलरोजी गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणी विशेष मोका न्यायालयाने २ संशयित आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरणात पाचव्या आरोपीला राजस्थानमधून मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती.  Salman Khan residence firing
सलमान खानच्या घरासमोर १४ एप्रिलरोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत गोळीबार केला होता. या प्रकरणानंतर खळबळ उडाली होती. दरम्यान, मुंबई पोलिसांनी २४ तासांत तपासाची सूत्रे वेगाने फिरवून अनेक संशयितांना अटक केली होती. आत्तापर्यंत ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती, यामधील एकाने कोठडीत असतानाच गळफास घेत जीवन संपवले. आणखी एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. Salman Khan residence firing
मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणातील पाचवा आरोपी मोहम्मद चौधरी याला राजस्थानामधून नुकतिच अटक केली आहे. त्याने सागर पाल आणि विक्की गुप्ता या दोन नेमबाजांना पैसे पुरवण्यात आणि रेकी करण्यात मदत केल्याचे तपासात समोर आले आहे. चौधरी याला मुंबईत आणण्यात आले असून, त्याला न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे, असे देखील मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केल्याचे वृत्तात म्हटले होते.

Firing incident outside actor Salman Khan’s residence on April 14 | Special MCOCA court remands 2 accused Sagar Pal and Vicky Gupta to judicial custody.#Mumbai
— ANI (@ANI) May 8, 2024

हेही वाचा 

Salman Khan residence firing case: सलमान खान निवासस्थान गोळीबार प्रकरण| पाचव्या संशयित आरोपीला राजस्थानमधून अटक
सलमान खान घराबाहेरील गोळीबार प्रकरण : मृत आरोपीच्या कुटुंबीयांची उच्‍च न्‍यायालयात धाव
Salman Khan residence firing case | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपीने कोठडीत जीवन संपवले