जळगाव : पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस मुख्यालयातील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) घडली. याप्रकरणी जिल्हा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
जळगाव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले गोविंद प्रेमचंद मोरे (वय-५०, रा. नाका रोड, धुळे ह.मु. भुसावळ) हे जळगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी (26 नोव्हेंबर) ते पोलीस मुख्यालयात नाईट ड्युटीला आलेले होते. सोमवारी (दि. 27) सकाळी आठ वाजताच्या सुमारास बाथरूममध्ये गेले असता अचानक चक्कर येऊन पडले. दरम्यान त्यांच्या सहकार्याने त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात भरती केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. ही घटना नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आक्रोश केला. मयत गोविंद प्रेमचंद मोरे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह भुसावळ येथे वास्तव्याला होते. त्यांना ड्युटीवर हृदय विकाराच्या झटका याची माहिती समोर आलेली आहे
The post जळगाव : पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.
जळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचे पोलीस मुख्यालयातील बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्याची घटना आज (दि. २७) घडली. याप्रकरणी जिल्हा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जळगाव पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले गोविंद प्रेमचंद मोरे (वय-५०, रा. नाका रोड, धुळे ह.मु. भुसावळ) हे जळगाव पोलीस मुख्यालयात कार्यरत होते. रविवारी (26 …
The post जळगाव : पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.