प्रवासभत्त्यांचे कमिशन बालविकास प्रकल्प अधिकारी बनसोडेला भोवले..!

पिंपळनेर, (जि.धुळे) : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील लाचखोर पर्यवेक्षिका शुभांगी बनसोडे ही तक्रारदाराकडून प्रवासभत्ता बिलाच्या 10 टक्क्याप्रमाणे 54 हजार रुपयांची लाच मागणी करुन ती स्वीकारताना पथकाला रंगेहाथ सापडली आहे. ‌तक्रारदार व त्यांच्या इतर 6 कार्यालयीन सहकारी असे सर्वांचे 9 लाख 37 हजार 533 रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर होऊन …

प्रवासभत्त्यांचे कमिशन बालविकास प्रकल्प अधिकारी बनसोडेला भोवले..!

पिंपळनेर, (जि.धुळे) : Bharat Live News Media वृत्तसेवा
पिंपळनेर येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयातील लाचखोर पर्यवेक्षिका शुभांगी बनसोडे ही तक्रारदाराकडून प्रवासभत्ता बिलाच्या 10 टक्क्याप्रमाणे 54 हजार रुपयांची लाच मागणी करुन ती स्वीकारताना पथकाला रंगेहाथ सापडली आहे.
‌तक्रारदार व त्यांच्या इतर 6 कार्यालयीन सहकारी असे सर्वांचे 9 लाख 37 हजार 533 रुपये एकत्रित प्रवास भत्त्याचे बिल मंजूर होऊन प्रत्येकाच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर शुभांगी बनसोडे यांनी तक्रारदार व त्यांच्या सहकारी कर्मचारी यांना त्यांच्या कक्षात बोलावून प्रवासभत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात प्रत्येकाकडून 10 टक्के प्रमाणे एकूण 93 हजार रुपये जमा करुन आणून देण्यास सांगितले. तसेच ”पैसे दिले नाही तर पुढील प्रवासभत्त्याची बिले काढुन देणार नाही” अशी तंबी देखील दिली होती.
एकात्मिक बालविकास प्रकल्प धुळे www.pudhari.news

याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर सापळा लावण्यात आला. शुभांगी बनसोडे पंचासमक्ष तक्रारदाराकडे सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रवासभत्ता बिलाचे 10 टक्के प्रमाणे 93 हजार 753 रुपये लाचेची मागणी करतांना आढळली. तसेच 54 हजार रुपये तिच्या कक्षात स्वीकारताना रंगेहात सापडली. बनसोडे विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
हि कारवाई उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सापळा अधिकारी रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ,धुळे. सापळा पथक-पोलीस हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, पोलीस शिपाई प्रशांत बागुल, वाहनचालक पोलीस हेड कॉन्सटेबल जगदीश बडगुजर यांनी केली आहे.