मध्यप्रदेशमध्ये मतपेट्या घेऊन जाणाऱ्या बसला आग; कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये मतपेट्या आणि मतदान कर्मचाऱ्यांना परत आणणाऱ्या बसला आग लागली. ही बस सहा मतदान केंद्रावरील मतदान साहित्य आणि कर्मचारी घेऊन बैतूल जिल्हा मुख्यालयाकडे येत असताना ही घटना घडली. मतदान झाल्यानंतर परतणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांनी जळत्या बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. चालकानेही जळत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सर्व मतदान कर्मचारी सुरक्षित आहेत.
सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिसनूर आणि पौनी गौला गावादरम्यान हा अपघात झाला. याची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बैतूल, मुलताई आणि आठनेर येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बसची आग विझवली आणि आत ठेवलेले मतदान साहित्य बाहेर काढले. त्यानंतर मतदान कर्मचारी आणि ईव्हीएम-व्हीव्हीपीएटी मशीन आणण्यासाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली होती.


Home महत्वाची बातमी मध्यप्रदेशमध्ये मतपेट्या घेऊन जाणाऱ्या बसला आग; कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव
मध्यप्रदेशमध्ये मतपेट्या घेऊन जाणाऱ्या बसला आग; कर्मचाऱ्यांनी उड्या मारून वाचवला जीव
पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील बैतूलमध्ये मतपेट्या आणि मतदान कर्मचाऱ्यांना परत आणणाऱ्या बसला आग लागली. ही बस सहा मतदान केंद्रावरील मतदान साहित्य आणि कर्मचारी घेऊन बैतूल जिल्हा मुख्यालयाकडे येत असताना ही घटना घडली. मतदान झाल्यानंतर परतणाऱ्या मतदान कर्मचाऱ्यांनी जळत्या बसमधून उडी मारून आपला जीव वाचवला. चालकानेही जळत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सर्व मतदान …