हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका घराची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह …

हैदराबादमध्ये पावसाने हाहाकार; घराची भिंत कोसळून ७ जणांचा मृत्यू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : हैदराबादमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. पावसामुळे मंगळवारी सायंकाळी येथील बांधकाम सुरू असलेल्या एका घराची भिंत कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली दबून ७ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.
भिंत कोसळून मृत्यू झालेले स्थलांतरित मजूर असून ते ओडिशा आणि छत्तीसगडमधून कामासाठी आले होते. आज (दि.८) सकाळी बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले.
हैदराबादमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागात पाणी साचल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येलाही सामोरे जावे लागले आहे. हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपत्ती निवारण दल पाणी साचलेल्या भागात पाठवण्यात आले आहे, जे पाण्याचा निचरा करण्याचे आणि कोसळलेली झाडे काढण्याचे काम करत आहेत.
हेही वाचा : 

काळजी घ्या! राज्यात ‘या’ भागात उष्णतेचा कहर; विदर्भात पावसाचा अंदाज
ब्राझीलमध्ये अतिवृष्टीचा कहर; ७५ जणांचा मृत्यू, लाखो लोक विस्थापित