बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ, रोहित पवारांकडून पोस्ट, संतापले अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे – ”अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक …

बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ, रोहित पवारांकडून पोस्ट, संतापले अजित पवार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बारामतीत पैसे वाटल्याचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला असून त्यांनी या व्हिडिओला कॅप्शनही दिली आहे. रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटले आहे – ”अजितदादा घ्या….. #ED आणि #CBI ने कारवाई केलेल्या तुमच्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत तुमच्या पदाधिकाऱ्याच्या नातलगाचा पैसे वाटल्याचा आणखी एक व्हिडिओ… आता या व्हिडिओत जो माणूस दिसतोय तो तुमच्या ओळखीचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा नातलग नाही असं म्हणू नका.. आणि इतर लोकं तुमच्या कंपनीचे कर्मचारी नाहीत, असंही म्हणू नका!”
काल रात्री बारामतीत पैसे वाटतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, रोहित पवार सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असल्याने त्यांच्याकडून वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राला न शोभणारा हा प्रकार आहे, रोहित पवार यांनी नौटंकी केली आहे. त्यांना मी लहानपणापासून ओळखतो. रोहित पवारांची सोशल मीडियासाठी चांगली टीम आहे. त्यांना सोशल मीडियाचा चांगला वापर करता येतो. हा जुना व्हिडिओदेखील असू शकतो. रोहित यांच्याकडून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे.