कोल्‍हापूर : गजरगावात बंधार्‍यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कोल्‍हापूर : गजरगावात बंधार्‍यात बुडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

गडहिंग्लज : Bharat Live News Media वृत्तसेवा गजरगाव (ता. आजरा) येथील हिरण्यकेशी नदीवरील बंधार्‍यामध्ये घरातील धुणे धुण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ७) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुळे येथील कटाळे कुटुंबातील उदय बचाराम कटाळे (वय ५४), अरुण बचाराम कटाळे (५६) हे बंधू घरातील धुणे धुण्यास या बंधार्‍यामध्ये गेले होते. या दरम्यान अरुण यांचा मुलगा जयप्रकाश (वय १३) हा बंधार्‍यामध्ये धुणे धुत असताना बुडाला. हे पाहताच त्याला वाचविण्यासाठी अरुण यांनी बंधार्‍यात उडी मारली. तर त्या पाठोपाठ उदय यांनीही उडी मारली. याबरोबरच आणखी एकानेही उडी मारली. मात्र उदय, अरुण व जयप्रकाश या तिघांचाही यामध्ये बुडून मृत्यू झाला.
सकाळी झालेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बंधार्‍यात मृतदेह शोधण्याचे काम तातडीने सुरु करण्यात आले. एकाच कुटुंबातील तीन जण बुडाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा : 

Kolhapur news | कोल्हापूर परिक्षेत्रात १६ हजारांवर समाजकंटकांवर कारवाईचा बडगा

Breaking ! बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी..

Lok Sabha Election 2024 | दोन टप्प्यांत कमी मतदान, कोणाचे होईल कल्याण?