सांगली: गोंधळेवाडी सरपंचावर अकार्यक्षमतेचा ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसे यांचा कारवाईचा बडगा

जत: पुढारी वृत्तसेवा: गोंधळेवाडी (ता.जत) येथील विद्यमान सरपंच लायव्वा सुभाष करांडे यांच्या कार्यक्षमतेवर, कामकाजावर, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याने, महिला सरपंच यांचे पती त्यांच्या खुर्चीवर बसून कारभार पाहत असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत नुकतेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सरपंच लायव्वा करांडे यांना कारवाईची नोटीस बजावली आहे. या कारवाईच्या बडग्याने तालुक्यातील अनेक … The post सांगली: गोंधळेवाडी सरपंचावर अकार्यक्षमतेचा ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसे यांचा कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.
#image_title

सांगली: गोंधळेवाडी सरपंचावर अकार्यक्षमतेचा ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसे यांचा कारवाईचा बडगा

जत: पुढारी वृत्तसेवा: गोंधळेवाडी (ता.जत) येथील विद्यमान सरपंच लायव्वा सुभाष करांडे यांच्या कार्यक्षमतेवर, कामकाजावर, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याने, महिला सरपंच यांचे पती त्यांच्या खुर्चीवर बसून कारभार पाहत असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत नुकतेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सरपंच लायव्वा करांडे यांना कारवाईची नोटीस बजावली आहे. या कारवाईच्या बडग्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांच्यात खळबळ उडाली आहे. Sangli News
मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांच्याकडे गोंधळेवाडी ग्रामस्थ व ग्रामसेवक यांनी सरपंच लायव्वा कारंडे व त्यांचे पती सुभाष करांडे यांच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. याबाबत जिल्हा परिषदेने चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीमध्ये गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर प्रमुख होते. या चौकशी समितीने दिलेल्या अहवालानुसार वस्तुस्थिती पडताळणी केल्याचे नमूद करत सरपंच कराडे यांच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. Sangli News
यात सरपंच म्हणून कर्तव्य बजवण्यात कसूर केल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारचे वर्तन योग्य नाही, तसेच ग्रामपंचायत सरपंच या नात्याने केलेल्या आर्थिक अनियमितता व कर्तव्यात कसुरी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तरी आपणावर कारवाई का करू नये? अशा पद्धतीचे ताशेरे ओढले आहेत. मनमानी कारभार याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांची चौकशी समिती नेमली होती या चौकशी समितीने १६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अहवाल जिल्हा परिषद कडे दिलेला होता. या अहवालानुसार सरपंच करांडे यांनी आर्थिक अनियमता गैरवर्तणूक ,कर्तव्यात कसुरी केल्याचे स्पष्ट केले आहे. ग्रामपंचायत मालकीचा पाण्याचा हौद नष्ट करण्यासाठी सरपंच करांडे यांनी ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घुसडून बांधकाम विभाग व पाणीपुरवठा विभागाकडून निर्लंखन प्रस्ताव मंजूर केला आहे. निर्लंखन झाल्यानंतर योग्य कार्यवाही व याबाबत दैनिकात जाहिरात देऊन लिलाव प्रक्रिया राबवणे अपेक्षित होते. सार्वजनिक पाण्याचा हौद पाडताना मनमानी पद्धत राबविले आहे.
दरम्यान याबाबत उमदी पोलिसात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. सरपंच यांनी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत पाण्याचा हौद पाडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले आहे. यामुळे कर्तव्यात कसूर करून ग्रामपंचायत अधिनियमाचे उल्लंघन केले आहे .सरपंच यांच्या खुर्चीवर सरपंच यांचे पती सुभाष करांडे बसतात.असे फोटो देखील व्हायरल झाले होते. हे फोटो देखील खरं असल्याचे चौकशी समितीने स्पष्ट केले आहे. या सर्व बाबींचा खुलासा देखील मुदतीत द्यावा अशी नोटीस मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी दिली आहे. याबाबत समाधानकारक खुलासा न झाल्यास सरपंच करांडे यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे .
Sangli News : सीईओ अॅक्टिव्ह मोडवर : जतमध्ये अनेक महिला सरपंच नावाला ग्रामपंचायतीमध्ये पतीराज
गत पंधरवड्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी शेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचारी व संख ग्रामपंचायत मधील एका ग्रामसेवका विरोधात निलंबनाची कारवाई केली होती. यापूर्वी एकुंडीच्या माजी सरपंच यांच्या कामकाज संदर्भात चौकशी समिती नेमली होती . नुकतेच गोंधळेवाडी सरपंच याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कारवाईचा बडगा उगारला आहे.तसेच महिला सरपंच यांचे पती सुभाष करांडे हे सरपंचाच्या खुर्चीवर बसून कामकाज करत असल्याने नोटिसामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रस्तावित कारवाईने चांगलीच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा 

सांगली : बालिकेच्या बळीचे आरोपी कोण?
सांगली : उसाला पहिली उचल 3,100 रुपये जाहीर
सांगली : पूल पाडायची घाई… रस्त्याचा पत्ता नाही

The post सांगली: गोंधळेवाडी सरपंचावर अकार्यक्षमतेचा ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसे यांचा कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

जत: पुढारी वृत्तसेवा: गोंधळेवाडी (ता.जत) येथील विद्यमान सरपंच लायव्वा सुभाष करांडे यांच्या कार्यक्षमतेवर, कामकाजावर, सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याने, महिला सरपंच यांचे पती त्यांच्या खुर्चीवर बसून कारभार पाहत असल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. याबाबत नुकतेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सरपंच लायव्वा करांडे यांना कारवाईची नोटीस बजावली आहे. या कारवाईच्या बडग्याने तालुक्यातील अनेक …

The post सांगली: गोंधळेवाडी सरपंचावर अकार्यक्षमतेचा ठपका; सीईओ तृप्ती धोडमिसे यांचा कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Go to Source