नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश

ओझर, पुढारी वृत्तसेवा: पोटाच्या पोरासारख्या बागा जपल्या. रविवारच्या पावसाने काही मिनटात होत्याच नव्हत केले. आता काहीच राहील नाही, शासन फक्त घोषणा करत पंचनाम्याचे आदेश होतात. पंचनामे होतात.. एकरी दोन ते तीन लाख खर्च होतो. पण मदत खुपच तोकडी होते साहेब, द्यायची तर भरभक्कम मदत द्या, तोकडी मदत देऊ नका, आमचे पीककर्ज माफ करा, अशी आर्जव … The post नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश appeared first on पुढारी.
#image_title

नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश

ओझर, पुढारी वृत्तसेवा: पोटाच्या पोरासारख्या बागा जपल्या. रविवारच्या पावसाने काही मिनटात होत्याच नव्हत केले. आता काहीच राहील नाही, शासन फक्त घोषणा करत पंचनाम्याचे आदेश होतात. पंचनामे होतात.. एकरी दोन ते तीन लाख खर्च होतो. पण मदत खुपच तोकडी होते साहेब, द्यायची तर भरभक्कम मदत द्या, तोकडी मदत देऊ नका, आमचे पीककर्ज माफ करा, अशी आर्जव नुकसानग्रस्त शेतक-यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. Nashik Heavy rain
कसबे सुकेणे व मौजे सुकेने तसेच पिंपरी आणि रौळस या शिवारात गारपीट अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठ्याप्रमाणत नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी पालकमंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केली. कसबे सुकेणा येथील संतोष भंडारे, भारत मोगल यांच्या द्राक्षबागेची यावेळी पाहणी केली. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे तातडीने दोन दिवसांत पूर्ण करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत देणार असल्याचे भुसे यांनी यावेळी आश्वासित केले. Nashik Heavy rain
रविवारी दुपारनंतर निफाड तालुक्यातील ओझर, दिक्षी दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे पिंपळस या भागात गारपीट, अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकासह कांदा, ऊस, टोमॅटो, फळबागा, पालेभाज्या आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचे येत्या दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकार्‍यांना दिले.
तसेच ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असेल, त्या शेतकर्‍यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीकविमा कंपनीकडे नोंदणी करण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले. याशिवाय कोणीही आपत्तीग्रस्त नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये, तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी शेतकर्‍यांना अश्वासित केले.
यावेळी आमदार दिलीप बनकर, माजी आमदार अनिल कदम, निफाडच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील, तहसिलदार शरद घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी संजय सुर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, कृषी पर्यवेक्षक प्रमोद पाटील, कृषी सहाय्यक योगेश निरभवणे, दिलीप मोरे, गोकुळ गीते, प्रणव पवार, दिलीप मोरे, विश्वास भंडारे, दीपक शिरसाठ, नाना पाटील भंडारे, समाधान सुर्वे, सरपंच आनंदराव भंडारे, ग्रामसेवक रवी अहीरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
हेही वाचा 

नाशिक : दहा मिनिटांत वर्षभराच्या मेहनतीवर पाणी; वादळी पाऊस, गारपिटीचा कहर
नाशिक जिल्ह्याला गारपिटीने झोडपले, पिकं मातीमोल
नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे मोठे नुकसानग्रस्त

The post नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश appeared first on पुढारी.

ओझर, पुढारी वृत्तसेवा: पोटाच्या पोरासारख्या बागा जपल्या. रविवारच्या पावसाने काही मिनटात होत्याच नव्हत केले. आता काहीच राहील नाही, शासन फक्त घोषणा करत पंचनाम्याचे आदेश होतात. पंचनामे होतात.. एकरी दोन ते तीन लाख खर्च होतो. पण मदत खुपच तोकडी होते साहेब, द्यायची तर भरभक्कम मदत द्या, तोकडी मदत देऊ नका, आमचे पीककर्ज माफ करा, अशी आर्जव …

The post नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश appeared first on पुढारी.

Go to Source