ब्रिजभूषण यांच्या मुलाला तिकीट दिल्याने लोकदल नेत्याचा राजीनामा
नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली वादग्रस्त ठरलेले, उत्तर प्रदेशातील भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांचा मुलगा, करणभूषण सिंह यांना कैसरगंज मतदारसंघात तिकीट दिल्याने, भाजपचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदल पक्षाचे प्रवक्ते रोहित जाखड यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
भाजपने महिला कुस्तीपटूंचा अवमान केला
ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या मुलाला तिकीट देऊन, भाजपने महिला कुस्तीपटूंचा अवमान केला आहे. माझ्यासाठी देशाचा सन्मान हा प्रथम आहे. प्रवक्तेपदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष जयंत चौधरी यांच्याकडे पाठविला असल्याचे, रोहित जाखड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :
मुख्तार अन्सारीचा मुलगा उमरला सर्वोच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन
Sushmita Sen : सुष्मिता सेनने सुंदर लहेंग्यात केला रॅम्पवॉक, ‘Taali’ पोझने वेधलं लक्ष
अकोला : ‘आरटीओ’च्या तपासणी यंत्रणेत अत्याधुनिक वाहनांची भर