पिंपरी : अखेर ‘तो’ रॅम्प दहा वर्षांनी वाहतुकीस होणार खुला
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकातील लूप (रॅम्प) तब्बल दहा वर्षांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत; मात्र तेथील दुभाजक बंद केला जाणार नसल्याने हा चौक सिग्नल फ्री होणार नसल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बँकेचे कर्ज घेऊन महापालिकेने चौकात उद्योजक जेआरडी टाटा दुमजली उड्डाणपूल बांधला आहे. कासारवाडीहून पिंपरीच्या दिशेने उतरण्यासाठी रॅम्प आणि पिंपळे गुरव-भोसरी पुलावरून चौकात उतरण्यासाठी लूप बांधला आहे.
लुपसाठी सुमारे 10 कोटींचा खर्च झाला आहे. वाहने थेट चौकात उतरणार असल्याने अपघात होण्याचा धोका असल्याने वाहतूक पोलिसांनी हा लूप वाहतुकीस खुला करण्यास परवानगी दिली नाही. गेली 10 वर्षे हा लूप बंद स्थितीत आहे. तर, लूप चुकीचा पद्धतीने बांधल्याने तो खुला केला जात नसल्याचा विरोधकांनी आरोप केला आहे. तर, महामेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर लूप सुरू करण्याची ग्वाही महापालिका आयुक्तांनी दिली होती.
मेट्रोचे काम पूर्ण झाल्याने लूप वाहतुकीस खुला केला जाणार आहे. त्यामुळे पुलावरून खाली चौकात येऊन पुण्याच्या दिशेने जाणार्या वाहन चालकांची सोय होणार आहे. मात्र, चौकात येथे दुभाजक लावून चौक सिग्नल फ्री करण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व बाजूच्या वाहन चालकांना येथे सिग्नलला थांबावे लागणार आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागाला अवकाळीने झोडपले
Pune : विनापरवाना टपर्यांकडे डोळेझाक
The post पिंपरी : अखेर ‘तो’ रॅम्प दहा वर्षांनी वाहतुकीस होणार खुला appeared first on पुढारी.
पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकातील लूप (रॅम्प) तब्बल दहा वर्षांनंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेने नागरिकांकडून सूचना मागविल्या आहेत; मात्र तेथील दुभाजक बंद केला जाणार नसल्याने हा चौक सिग्नल फ्री होणार नसल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक बँकेचे कर्ज घेऊन महापालिकेने चौकात उद्योजक जेआरडी टाटा दुमजली …
The post पिंपरी : अखेर ‘तो’ रॅम्प दहा वर्षांनी वाहतुकीस होणार खुला appeared first on पुढारी.