Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) आयपीएल २०२४ च्या ५३ व्या सामन्यात फलंदाजी केली नाही, परंतु त्याने एक विशेष कामगिरी केली. आयपीएलच्या इतिहासात १५० झेल घेणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. धोनीने पंजाबविरुद्ध जितेश शर्माचा झेल घेत हा खास टप्पा गाठला.
महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) यष्टिरक्षक म्हणून १४६ आणि क्षेत्ररक्षक म्हणून ४ झेल घेतले आहेत. या बाबतीत दिनेश कार्तिक १४४ झेलांसह दुसऱ्या स्थानावर असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स ११८ झेलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली ११३ झेलांसह चौथ्या स्थानावर आहे.
पंजाब किंग्जविरुद्धच्या विजयासह चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर.
तीन प्रमुख गोलंदाजांच्या गैरहजेरीतही चेन्नई सुपर किंग्जने १६७ धावांचा यशस्वी बचाव करून दाखवला.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात सीएसकेची आयपीएल २०२४ गुणतालिकेत १२ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप.
या पराभवाने पंजाब किंग्जची वाटचाल प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर जाण्याच्या दिशेने.
चेन्नईचा १११५ दिवसांनंतर पंजाबवरील पहिला विजय. मागील ५ सामन्यांत पंजाबने मारली होती बाजी.
आयपीएलमध्ये १५० झेल घेण्याचा विक्रम करणारा एमएस धोनी पहिला खेळाडू ठरला आहे.
धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने २० षटकात ९ गडी गमावून १६७ धावा केल्या. कर्णधार रुतुराज गायकवाडने आतापर्यंत ११ सामन्यांत १० वेळा नाणेफेक गमावली आहे. या सामन्यात धोनी (MS Dhoni) नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. आयपीएलच्या इतिहासात आणि त्याच्या १८ वर्षांच्या टी-२० कारकिर्दीत माही नवव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, हर्षल पटेलच्या पहिल्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. धोनीच नाही तर पंजाबचा यष्टिरक्षक जितेश शर्माही खाते उघडू शकला नाही. आयपीएलच्या इतिहासात ही पाचवी वेळ आहे जेव्हा दोन्ही संघांचे यष्टीरक्षक एका सामन्यात खातेही उघडू शकले नाहीत. जितेशला सिमरजीत सिंगने धोनीच्या हाती झेलबाद केले.
हेही वाचा :
आरसीबीला ‘काडीचा आधार’
T20 World cup : रिंकू सिंहला संघात का घेतलं नाही? सौरव गांगुलींनी सांगितले कारण
12 वर्षांनी ‘वानखेडे’ जिंकले; कोलकाता नाईट रायडर्सचा मुंबई इंडियन्सवर 24 धावांनी विजय