पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीत बांधकाम सुरु असणार्या बोगद्यात अडकलेले ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आज बचावकार्याचा १६ वा दिवस आहे. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी रेस्क्यू रोबोटिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी आज ( दि.२७) दिली.
(Uttarakhand tunnel rescue )
Uttarakhand tunnel rescue : कसे काम करेल रोबोटिक तंत्रज्ञान?
कामगारांना पुरविण्यात येणार्या रोबोटिक सिस्टीम ( यंत्रणा) च्या माध्यमातून बोगद्यातील मिथेनसारखे घातक वायूचा शोध घेण्यात येईल. त्याचबरोबर कामगारांना इंटरनेट सेवेवा देवून त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात येईल.याच माध्यमातून आम्ही कामगारांची मानसिक स्थिती सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी सांगितले. यापूर्वी लखनौमध्ये इमारत दुर्घटनानंतर ठढीगार्याखाली अडकलेल्या १४ जणांवा जिवंत बाहेर काढण्यात आले होते. यावेळी बचावकार्यात अशाच प्रकारची रोबोटिक प्रणाली वापरल्याचेही त्यांनी नमूद केले.
Uttarakhand tunnel rescue: Robots to check on mental well-being of trapped workers
Read @ANI Story | https://t.co/a3eNMw4zsJ#UttarakhandTunnelRescue #Robots #Uttarkashi #Uttarakhand pic.twitter.com/cNbGTnNB7U
— ANI Digital (@ani_digital) November 27, 2023
बोगद्यात अडकलेल्या ऑगर मशीनचे काही भाग कापून बाहेर काढण्यात आले आहेत. यानंतर मॅन्युअल ड्रिलिंगचे (कामगारांच्या सहाय्याने खोदकाम) काम सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सचिव डॉ. पीके मिश्रा यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथे अडकलेल्या कामगारांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. तसेच कामगारांना पाठवल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची माहिती घेतली.
Uttarakhand tunnel rescue : आम्ही प्रगती करत आहोत : अर्नोल्ड डिक्स
आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी सांगितले की, आम्ही प्रगती करत आहोत. आम्ही करत असलेल्या टीमचा मला खूप अभिमान वाटतो. मॅन्युअल ड्रिलिंग अद्याप सुरू झालेले नाही, ते सुरू होताच आम्ही कामगारांच्या सुटकेसाठीच्या अंतिम टप्प्यात वाटचाल करू.माजी ‘बीआरओ’ प्रमुख लेफ्टनंट जनरल हरपाल सिंग (निवृत्त) यांगी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत अडकलेले ऑगर मशीन काढून टाकण्यात आले आहे. खराब झालेल्या पाईपचा १.५ मीटर भाग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढिगारा हटवल्यानंतर, मजबुतीकरण केल्यानंतर, लष्कराच्या मदतीने कुशल मजूर आत जातील. आम्हाला आशा आहे की, हे लवकरच पूर्ण होईल.
बोगद्याच्या वरती ३६ मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग करण्यात आले आहे. दरम्यान, प्रधान सचिव पीके मिश्रा, गृह सचिव अजय कुमार भल्ला आणि मुख्य सचिव एसएस संधू मीटिंग हॉलकडे रवाना झाले. बैठकीत बचाव कार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.
#WATCH | Uttarkashi (Uttarakhand) tunnel rescue | Micro tunnelling expert Chris Cooper says, “… All the debris (of the Auger machine) removed…(Manual drilling) will probably start after 3 hours…We have 9 meters of hand tunnelling to do. It really depends on how the ground… pic.twitter.com/ORRGlMovbH
— ANI (@ANI) November 27, 2023
हेही वाचा :
Uttarkashi Tunnel Rescue: बचावकार्यात पुढील तीन दिवस आव्हानात्मक, जाणून घ्या काय आहे कारण?
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तरकाशीतील ४१ कामगारांच्या बचावासाठी आता ‘मॅन्युअल व्हर्टिकल ड्रिलिंग’
Uttarakhand tunnel collapse Updates : दहाव्या दिवशी बोगद्यात पोहोचला कॅमेरा, ४१ कामगारांचा व्हिडिओ आला समोर
The post ‘रोबोटिक’ प्रणालीद्वारे होणार बोगद्यात अडकलेल्या कामगारांना मदत appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तरकाशीत बांधकाम सुरु असणार्या बोगद्यात अडकलेले ४१ कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आज बचावकार्याचा १६ वा दिवस आहे. दरम्यान, बोगद्यात अडकलेल्या कामगारांची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी रेस्क्यू रोबोटिक प्रणालीचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती रोबोटिक्स तज्ज्ञ मिलिंद राज यांनी आज ( दि.२७) दिली. (Uttarakhand tunnel rescue ) …
The post ‘रोबोटिक’ प्रणालीद्वारे होणार बोगद्यात अडकलेल्या कामगारांना मदत appeared first on पुढारी.