भाजपचे 25 आमदार फोडण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता

[author title=”विवेक गिरधारी/चंदन शिरवाळे” image=”http://”][/author] मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंसाठी कोणतीही खिडकी उघडलेली नाही. उद्धव ‘व्यक्तिगत’ संकटात असतील तर पाठीशी उभा राहीन, असे त्यांनी म्हटले आहे. राजकीय संकटात नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाने उठवलेल्या चर्चा खाली बसवल्या. याच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा …

भाजपचे 25 आमदार फोडण्याचा कट उद्धव ठाकरेंनी रचला होता

[author title=”विवेक गिरधारी/चंदन शिरवाळे” image=”http://”][/author]
मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंसाठी कोणतीही खिडकी उघडलेली नाही. उद्धव ‘व्यक्तिगत’ संकटात असतील तर पाठीशी उभा राहीन, असे त्यांनी म्हटले आहे. राजकीय संकटात नव्हे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाने उठवलेल्या चर्चा खाली बसवल्या. याच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद शाबूत ठेवण्यासाठी भाजपचे 25 आमदार फोडण्याचा प्रयत्न केला होता. आता अशा धोकेबाज ठाकरेंशी भाजपलाच युती नको आहे, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी दै. ‘Bharat Live News Media’ला दिलेल्या मुलाखतीत केला. लोकसभा जागावाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भाजप जेमतेम एकअंकी जागा देईल, असे सुरुवातीचे चित्र होते. एकनाथ शिंदे तहात हरणार, असेही म्हटले जाऊ लागले होते.

प्रत्यक्षात शिंदे यांनी दक्षिण मुंबईसारखी सतत खुणावणारी जागा भाजपला सोडायला लावली. ठाणे, नाशिक मिळवलेच; छत्रपती संभाजीनगरदेखील भाजपकडून मिळवले. जागावाटपाचा तह जिंकल्यानंतर प्रत्यक्ष युद्धात आता या जागा राखण्याचे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तुमच्या पंधरा जागांपैकी तेरा लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झुंज आहे. त्या तुलनेत भाजपने सेनेविरुद्ध फक्त पाच तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दोनच मतदारसंघात शिवसेनेसोबतची लढाई निवडली आहे. हे कसे?

– आमच्यासमोर कुठेही शिवसेना नाही. खरी शिवसेना आम्ही आहोत. मूळ शिवसेना पक्ष आणि चिन्हासह आमच्याकडे आहे. आम्हीच आमच्या विरुद्ध म्हणजे शिवसेनाच शिवसेनेविरुद्ध लढणार असे नाही. उद्धव ठाकरेंचा पक्ष शिवसेना नाही. ती उबाठा आहे. आमच्या अस्सल शिवसेनेची लढाई उबाठा सोबत आहे असे म्हणा! लोक अत्यंत सुज्ञ आहेत. ते उबाठाला कायमचे घरी बसवतील आणि आमच्या खर्‍या शिवसेनेला निवडून देतील.