सोलापूर : ‘उजनी’तून १० मे रोजी पाणी सोडणार

सोलापूर; Bharat Live News Media वृत्तसेवा : सोलापूर शहरावरील जलसंकट टळण्याची शक्यता आहे. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीच्या माध्यमातून पाच टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. साधरण दहा दिवसांत हे पाणी औज बंधार्यांत पोहोचणार आहे.
शहराला पाणीपुरवठा करणार्या औज बंधार्यांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे उजनी धरणातून शेवटचे अवर्तन सोडण्याची मागणी पालिका प्रशासनाच्या वतीने केली होती. त्यानुुसार शासनाकडून सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश पाटबंधारे विभागास प्राप्त झाले आहेत. 10 मे रोजी उजनी धरणातून पाणी सोडले जाणार आहे. साधरण दहा दिवसांत हे पाणी औज बंधार्यात पोहोचणार आहे. औज व चिंचपूर बंधारा साडेचार मीटरपर्यंत भरून घेतले जाणार आहेत. त्यामुळे पाणी टंचाई टळणार आहे.
तिबार पंपिंग यंत्रणा सज्ज
औज बंधार्यात पाणीसाठा कमी आहे. उजनी धरणातून तिबार पंपिंगची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सोडलेल्या पाण्यामुुळे उजनीची पाण्याची पातळी कमी होणार आहे. त्यामुळे तिबार पंपिंग यंत्रणा चालू केली आहे. 7 जूनपर्यंत पावसाळा चालू होणार आहे. त्यामुळे सोडलेल्या पाण्यामुळे औज आणि चिंचपूर बंधारा भरल्यानंतर शहरावरील जलसंकट टळणार आहे.
हेही वाचा :
Heatwave alert: देशाच्या ७ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान खात्याचा इशारा
भंडारा : अबब… महिलेच्या गर्भ पिशवीतून निघाले भले मोठे कापड; तुमसर उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार
Parbhani News : पूर्णा तालुक्यातील शेतकरी अवकाळी अनुदान वाटपाच्या प्रतीक्षेत
