बीड : तलवार बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक

आष्टी, Bharat Live News Media वृत्तसेवा : तालुक्यातील घाटा पिंपरी गावात स्वतःजवळ तलवार बाळगून गावात दहशत निर्माण करणाऱ्याचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी रविवारी (दि.५) अटक केली. सागर आकाश मुळीक (रा. घाटा पिंपरी ता. आष्टी) असे या संशयिताचे नाव असून अंभोरा पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, घाटा पिंपरी गावात गावामध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने एका तरूणाने स्वतःजवळ तलवार बाळगली आहे, अशी माहिती सपोनि मंगेश साळवे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून धारदार शस्त्रासह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत धारदार शस्त्रासह तरूण आढळून आल्यामुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :
छ. संभाजीनगर : लग्न सोहळा आटोपून परतत असताना अपघात; माय-लेकाचा मृत्यू
धुळे : कापसाची चोरी करणाऱ्या टोळीला तडीपारीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश
Bhandara Accident | भंडारा: दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू
