छ. संभाजीनगर : लग्न सोहळा आटोपून परतत असताना अपघात; माय-लेकाचा मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पाहुण्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटपून गावाकडे परत जात असताना झालेल्या अपघातात आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पैठण रोडवर बोलोरो – दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने रविवारी (दि.५) हा अपघात झाला. मुमताज राजू शेख व मुलगा समीर राजू शेख ( दोघेही रा. लिंबेजळगाव ता. गंगापूर) अशी मृत्यू झालेल्या माय- लेकाची नावे आहेत. याबाबत …

छ. संभाजीनगर : लग्न सोहळा आटोपून परतत असताना अपघात; माय-लेकाचा मृत्यू

पैठण; Bharat Live News Media वृत्तसेवा : पाहुण्याच्या लग्नाचा कार्यक्रम आटपून गावाकडे परत जात असताना झालेल्या अपघातात आई व मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पैठण रोडवर बोलोरो – दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने रविवारी (दि.५) हा अपघात झाला. मुमताज राजू शेख व मुलगा समीर राजू शेख ( दोघेही रा. लिंबेजळगाव ता. गंगापूर) अशी मृत्यू झालेल्या माय- लेकाची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, गंगापूर तालुक्यातील लिबेजळगाव येथील मुमताज शेख या आपला मुलगा समीर याच्याबरोबर हादगाव (ता. शेवगाव) पाहुण्यांच्या लग्नकार्याला गेले होते. तेथील कार्यक्रम आटपून परत दुचाकीवरून गावी येत असताना छत्रपती संभाजीनगर -पैठण रोडवर बोलोरो पिकअप (MH 16 -AY 8212) वाहनाची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. अपघातात मुमताज शेख व समीर शेख हे दोघेही गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांनी मृत घोषित केले. याप्रकरणी बोलेरो वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे करत आहेत.
हेही वाचा :

नांदेड: किनाळा येथे वऱ्हाडाचा टेम्पो उलटून १७ जण गंभीर जखमी
Gondia Crime News: म्हसगावच्या ढिवरू इळपाचे खून प्रकरणाला नवे वळण; आणखी दोन संशयितांना अटक
दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात; गणेश दर्शनासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू