फडणवीसांच्या अटकेचे कारस्थान उघड करणार : मोहित कंबोज

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेसाठी कारस्थान रचण्यात आले होते. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या कारस्थानाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे भाजप नेते मोहित कंबोज यांनी रविवारी जाहीर केले. या कारस्थानात एक महिला नेत्या, एक आमदार आणि एका आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा …

फडणवीसांच्या अटकेचे कारस्थान उघड करणार : मोहित कंबोज

मुंबई; Bharat Live News Media वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेते आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेसाठी कारस्थान रचण्यात आले होते. ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या कारस्थानाचा लवकरच पर्दाफाश करणार असल्याचे भाजप नेते मोहित कंबोज यांनी रविवारी जाहीर केले. या कारस्थानात एक महिला नेत्या, एक आमदार आणि एका आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश असल्याचा इशारा दिला आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात भाजप नेत्यांच्या अटकेच्या प्रयत्नांचा मुद्दा लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात पुढे आला आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान एका मुलाखतीत त्याबाबतचे विधानही केले होते. मात्र, त्याबाबतचे अधिक तपशील उघड करणे फडणवीसांनी टाळले. त्यानंतर आता भाजप नेते मोहित भारतीय यांनी थेट हे कारस्थान उघड करण्याचा इशारा दिला आहे.
एक्सवरील पोस्टमध्ये मोहित भारतीय यांनी याबाबत थेट इशारा देणारी पोस्ट टाकली आहे. ‘शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्या अटकेसाठी रचलेल्या कारस्थानाचा लवकरच पर्दाफाश करणार आहे. यासाठी एका गुन्हेगार माजी पत्रकाराला काम देण्यात आले होते. यासर्व कारस्थानामागे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एका महिला नेत्याचा आणि एका आयपीएस अधिकाऱ्याचे डोके होते. तर, एका आमदाराने त्यासाठी पैसा पुरविला होता. या सर्वांनी मिळून कशा पद्धतीने खोटी माहिती तयार करण्याचे काम केले, हे लवकरच उघड करणार आहे,’ असे नमूद केले आहे.
अलीकडेच स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सूचक वक्तव्य केले होते. महाविकास आघाडीच्या काळात अनेक भाजप नेत्यांना अटक करण्याचे डाव रचले गेले. मला कोणत्या तरी खोट्या केसमध्ये गुंतवायचे प्रयत्न होते. कुठल्या तरी केसमध्ये फसवायचे यासाठी आटापीटा सुरू होता. त्यासाठी एक पोलीस आयुक्तही त्यांनी आणून बसविला होता. माझ्या केसापासून पायाच्या नखापर्यंत चौकश्या करून फसविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्यांना काही सापडले नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
हेही वाचा :

कुटुंब कलह : सहानुभूतीची महती!
सांगली: खरसुंडी येथे माणदेशी राजा सिद्धनाथांची चैत्र यात्रा उत्साहात
Women’s T20 World Cup : महिला टी-20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! जाणून घ्या भारताचे सामने कधी होणार