Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इस्त्रायलमधील अल जझिरा चॅनलचे कार्यालय बंद करण्याचा निर्णय बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रीमंडळाने घेतला आहे. कतारच्या मालकीच्या ब्रॉडकास्टर अल जझीराची स्थानिक कार्यालये बंद करण्यासाठी एकमताने मतदान केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, अल जझीराकडून या निर्णयाबाबत तात्काळ कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
नेतन्याहू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “माझ्या सरकारने सर्वानुमते निर्णय घेतला आहे. इस्त्रायलमध्ये चिथावणी देणारी चॅनेल अल जझिरा बंद होईल,”
BREAKING: Netanyahu’s Cabinet votes to close Al Jazeera offices in Israel https://t.co/AUAa73HkmS
— The Associated Press (@AP) May 5, 2024
अल जझिरा च्या वार्ताहराने म्हटलं आहे की, या आदेशाचा इस्त्रायल आणि पूर्व जेरुसलेममधील ब्रॉडकास्टरच्या कार्यावर परिणाम होईल. मात्र याचा पॅलेस्टिनी प्रदेशातील अल जझीराच्या कार्यावर परिणाम होणार नाही. दरम्यान, या निर्णयाबाबत इस्त्रायलच्या माध्यमांनी म्हटलं आहे की, या निर्णयानुसार इस्त्रायलला 45 दिवसांपर्यंत चॅनल ब्लॉक करण्याची परवानगी मिळते.
अल जझिरा हे हवाई हल्ले आणि गर्दीने भरलेल्या रुग्णालयांचे रक्तरंजित दृश्य प्रसारित करते. तसेच इस्रायलवर नरसंहार केल्याचा आरोप करते, असा आरोप इस्रायलकडून सातत्याने होत आहेत.
हेही वाचा :
रक्तरंजित संघर्ष चिघळणार! आता इस्त्रायलचे टार्गेट रफाह, इजिप्तने दिला घातक परिणामांचा इशारा
अमेरिकेने इस्त्रायलवर डोळे वटारले; नेत्याहून म्हणाले, “आमचे जवान…”
Israel-Iran War : “… त्यांना किंमत मोजावी लागेल” : इस्त्रायलचा इराणला इशारा