परभणी: पूर्णा तालुक्यातील शेतकरी अवकाळी अनुदान वाटपाच्या प्रतीक्षेत

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील शेतशिवारात २७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या पहाटे जोरदार अवकाळी पाऊस पडून शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने महसुल प्रशासनास जायमोक्यावर जावून बाधित पिकांचे पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले होते. अनुदानासाठी २६ कोटी ९३ लाखांचा निधीही मंजूर झाला होता. परंतु, हा निधी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, त्यामुळे शेतकरी वर्गांतून … The post परभणी: पूर्णा तालुक्यातील शेतकरी अवकाळी अनुदान वाटपाच्या प्रतीक्षेत appeared first on पुढारी.

परभणी: पूर्णा तालुक्यातील शेतकरी अवकाळी अनुदान वाटपाच्या प्रतीक्षेत

पूर्णा, Bharat Live News Media वृत्तसेवा: तालुक्यातील शेतशिवारात २७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या पहाटे जोरदार अवकाळी पाऊस पडून शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यानंतर शासनाने महसुल प्रशासनास जायमोक्यावर जावून बाधित पिकांचे पंचनामे सादर करण्याचे आदेश दिले होते. अनुदानासाठी २६ कोटी ९३ लाखांचा निधीही मंजूर झाला होता. परंतु, हा निधी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही, त्यामुळे शेतकरी वर्गांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. Parbhani News
नुकसानग्रस्त शेतक-यांच्या याद्या तयार करुन गावनिहाय अधार नंबर, बँक खाते, मोबाईल नंबर लिहून घेवून परत याद्या तहसिल कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्षात शासनाच्या डिसबसमेंट पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्या होत्या. त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. परिणामी, व्हीके नंबर (विशिष्ट क्रमांक) येण्याची प्रक्रिया बंद झाली. व्हीके नंबर आल्यानंतर शेतक-यांना महा ई सेवा केंद्रावर जावून अंगठा लावून केवायशी करायची आहे. त्यानंतर अनुदान रक्कम शेतक-यांच्या बचत खात्यात वर्ग होण्याची नवीन पध्दत शासनाने अवलंबली आहे. परंतु, आता परभणी लोकसभा निवडणूक मतदान संपूनही सदर तहसिल कार्यालयातील डिसबसमेंट पंचनामा पोर्टल चालू केलेले नाही. Parbhani News
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नायब तहसीलदार यांनी सदरील पोर्टल चालू करा, म्हणून शासन स्तरावर मागणी केलेली नाही. प्रशासनाची शेतक-यांप्रती काळजी दिसून येत नाही. महसूल अधिकारी अवैध गौणखनिज व रेती तस्करी अशा वाद विवाद प्रकरणात अडकल्याने त्यांना शेतक-यांची समस्या कशी कळणार? येत्या चार दिवसांत पोर्टल चालू करुन व्हीके नंबर देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास तहसिल कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
पिंपळा लोखंडे व इतर काही गावातील शेतक-यांच्या खरीप, रब्बी पिकांबरोबरच संत्रा, पेरु, लिंबोनी फळबागेचे प्रचंड नुकसान अवकाळीमुळे झाले होते. या फळबागेचे अनुदान रखडले आहे. पिंपळा लोखंडे येथील शेतक-यांनी दुष्काळात कर्जबाजारी होत टँकरने पाणी विकत आणून संत्रा बागा जोपासल्या. परंतु अवकाळीने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला आहे.
बालाजीराव विठ्ठलराव लोखंडे
– संत्रा उत्पादक शेतकरी, पिंपळा लोखंडे (ता. पूर्णा)
हेही वाचा 

परभणी हादरले..! प्रेमसंबंधास विरोध करत आई-बापाने केला पोटच्‍या मुलीचा खून, मृतदेहही जाळला
परभणी: जिंतूर येथे हॉटेल मालक, नोकरांच्या मारहाणीत पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू; ४ जणांना अटक
परभणी : पिपरी गीते जवळ दुचाकीची समोरासमोर जोराची धडक; एक ठार

Latest Marathi News परभणी: पूर्णा तालुक्यातील शेतकरी अवकाळी अनुदान वाटपाच्या प्रतीक्षेत Brought to You By : Bharat Live News Media.