PBKS vs CSK : चेन्नईला सहावा धक्का, सँटनर बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमिअर लीग ( IPL) स्पर्धेत आज 53 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज आमने-सामने आहेत. धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. पंजाबने गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर चेन्नईचा पराभव केला होता. आजच्या सामन्यात पंजाबने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे.
चेन्नईला 16व्या षटकात 122 धावांवर सहावा धक्का बसला. राहुल चहरने मिचेल सँटनरला कुरनकरवी झेलबाद केले. त्याला 11 चेंडूत 11 धावा करता आल्या. सध्या शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. 17 षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या सहा गडी गमावत 136 धावा आहेत.
१०१ धावांमध्ये चेन्नईचा निम्मा संघ तंबूत
चेन्नईला 13व्या षटकात 101 धावांवर पाचवा धक्का बसला. सॅम करनने मोईन अलीला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. 20 चेंडूत 17 धावा करून तो बाद झाला. सध्या रवींद्र जडेजा आणि मिचेल सँटनर क्रीजवर आहेत. तत्पूर्वी, डॅरिल मिशेल बाद झाला. त्याचवेळी शिवम दुबेला खातेही उघडता आले नाही.
डेरिल मिशेलही तंबूत परतला
९ व्या षटकात मिचेल याला पंजाबच्या हर्षल पटेल याने पायचीत केले. त्याने १९ चेंडूत २ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३० धावा केल्या. ७५ धावांवर चेन्नईला चाैथा धक्का बसला.
ऋतुराज पाठाेपाठ शिवम दुबेही आऊट
आठव्या शतकात राहुल चहरने जितेश शर्मा करवी रुतुराज गायकवाडला बाद केले. त्याने २१ चेंडूत चार चौकार आणि १ षटकार लगावत ३२ धावा केल्या. यानंतर दुसर्या चेंडूवर राहुल चहर याने जितेश शर्मा करवी शिवम दुबेला झेलबाद केले. चेन्नईला ६९ धावांवर सलग दोन धक्के बसले. शिवम दुबे सलग दुसर्यांदा शून्यवर बाद झाला आहे.
पाॅवर प्लेमध्ये मिचेल-ऋतुराजने चेन्नईचा डाव सावरला
चेन्नई सुपर किंग्जला पहिला धक्का दुसऱ्याच षटकात १२ धावांवर बसला. अर्शदीप सिंगने रहाणेला रबाडाकडून झेलबाद केले. त्याला सात चेंडूंत नऊ धावा करता आल्या. यानंतर कर्णधार रुतुराज गायकवाड आणि डेरिल मिशेल यांनी डाव सावरला. सहा षटकांनंतर चेन्नईने एक गडी गमावून ६० धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात हरप्रीत ब्रारच्या षटकात चेन्नईने 19 धावा केल्या. चेन्नईच्या फलंदाजांनी तीन चौकार आणि एक षटकार लगावला.
चेन्नई सुपर किंग्ज संघ : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, रिचर्ड ग्लीसन, तुषार देशपांडे. इम्पॅक्ट प्लेअर : समीर रिझवी, सिमरजीत सिंग, शेख रशीद, मुकेश चौधरी, प्रशांत सोलंकी.
पंजाब किंग्ज: जॉनी बेअरस्टो, रिले रौसो, शशांक सिंग, सॅम कुरन (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग, इम्पॅक्ट प्लेअर: प्रभसिमरन सिंग, हरप्रीत सिंग भाटिया, तनय थियागराजन, विद्वत कवेरप्पा, ऋषी धवन.
Latest Marathi News PBKS vs CSK : चेन्नईला सहावा धक्का, सँटनर बाद Brought to You By : Bharat Live News Media.
