भंडारा: दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडारा,पुढारी वृत्तसेवा: नातेवाईकांकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेले ३ मित्र स्वागत समारोहाजवळच असलेल्या एका खाली मैदानात बसण्यासाठी गेले होते. तिथून दुचाकीने परत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सूटुन ती खड्ड्यात कोसळली. यात दुचाकींवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला. ही घटना (Bhandara Accident) लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४) … The post भंडारा: दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

भंडारा: दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडारा,Bharat Live News Media वृत्तसेवा: नातेवाईकांकडे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी आलेले ३ मित्र स्वागत समारोहाजवळच असलेल्या एका खाली मैदानात बसण्यासाठी गेले होते. तिथून दुचाकीने परत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सूटुन ती खड्ड्यात कोसळली. यात दुचाकींवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला. ही घटना (Bhandara Accident) लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली.
पियुष विजयकुमार तिरपुडे (२४) रा.अर्जुनी मोर, लकी भारत नाकाडे (२०) रा. ब्रम्हपुरी अशी मृतक युवकांची नावे आहेत.
भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत असताना वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटले व एका खड्ड्यात दुचाकी कोसळली. यात दुचाकीवरील तिघेही जण रस्त्यावर कोसळून गंभीर जखमी झाले. तिघांवरही लाखांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच (Bhandara Accident) दोघांचा मृत्यू झाला होता.
Latest Marathi News भंडारा: दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू Brought to You By : Bharat Live News Media.