ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी कारखान्यांना दैनंदिन पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करणे ऊसतोडणी मजुरांअभावी अडचणींचे ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसत आहे. मजुरांअभावी अशी परिस्थिती ओढवल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. यंदा ऊसटंचाईची … The post ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र appeared first on पुढारी.
#image_title

ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी कारखान्यांना दैनंदिन पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करणे ऊसतोडणी मजुरांअभावी अडचणींचे ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसत आहे. मजुरांअभावी अशी परिस्थिती ओढवल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. यंदा ऊसटंचाईची झळ साखर कारखान्यांना बसली असताना आता दुष्काळात तेरावा या म्हणीप्रमाणे ऊस तोडणी मजूर उपलब्ध होत नसल्याने कारखान्यांच्या अडचनीत वाढ होताना दिसत आहे.राज्यात बहुतेक सर्वच साखर कारखान्यांत विस्तारीकरण झाल्याने दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. हीच वाढ आता साखर कारखान्यांना यंदा संकटात टाकत आहे.
एकीकडे मजुरांची संख्या घटली तर दुसरीकडे ऊसउत्पादनही घटले. त्यामुळे हंगामाची उद्दिष्टपूर्ती तर बाजूलाच, पण दैंनदिन गाळप क्षमता साध्य करणेही जिकिरीचे ठरत आहे. संपूर्ण राज्यातच साखर उद्योगासमोर मजूर टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.
तालुक्यातील भेंडा येथील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे उदाहरण घेतल्यास गेल्या हंगामात या कारखान्याकडे 887 बैल टायर व 450 ट्रॅक्टर होते. यंदा ही संख्या 370 बैल टायर,215 ट्रॅक्टर अशी आहे. अशीच परिस्थिती बहुतेक साखर कारखाना शेतकी व्यवस्थापनाची झालेली दिसत आहे. तोडणी मजूर घटल्याने ऊसउत्पादक व साखर कारखाने अशी दोन्हींची अडचण होत आहे. हंगाम सुरू होऊन महिना झाला, तरी कारखान्यांचे शेतकी विभाग तोडणी मजुरांसाठी दाहीदिशांना फिरताना दिसत आहेत.
पाथर्डी, बीडमध्ये मजूर संख्या घटली
पाथर्डी, बीड येथील ऊसतोडणी मजुरांची संख्या कमालीची घटली आहे. नवी पिढी नोकरी, व्यवसायाकडे झुकली आहे. सध्या जळगाव, धुळे, हिंगोली, यवतमाळ जिल्हा, तसेच साखर कारखाना परिसरातून ऊसतोडणी मजूर टोळ्या कार्यरत आहेत. परंतु त्यांची संख्याही कमी आहे.
The post ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र appeared first on पुढारी.

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी कारखान्यांना दैनंदिन पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करणे ऊसतोडणी मजुरांअभावी अडचणींचे ठरत आहे. जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांना दैनंदिन उसाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने पूर्ण क्षमतेने गाळप होत नसल्याचे दिसत आहे. मजुरांअभावी अशी परिस्थिती ओढवल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. यंदा ऊसटंचाईची …

The post ऊस, मजूर टंचाईचे कारखान्यांपुढे संकट ; नगर जिल्ह्यातील चित्र appeared first on पुढारी.

Go to Source